वयाच्या विसाव्या वर्षात आलिशान कार विकत घेणारी कोण आहे ही मराठी अभिनेत्री???

वयाच्या विसाव्या वर्षात आलिशान कार विकत घेणारी कोण आहे ही मराठी अभिनेत्री???

झी युवा वाहिनीवरच्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतील प्रमुख पात्र म्हणजे सई. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली.ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मध्ये सईची भूमिका रंगवणारी गौरी कुलकर्णी ही २०२१ या नवीन वर्षात सर्व इच्छा आकांशा पूर्ण करताना दिसतेय.

गौरीने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. तिने या नवीन गाडीचे स्वागत करतानाचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या नवीन गाडीचे स्वागत करताना गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने गाडी सोबतचा फोटो ‘एक नवीन सदस्य’ असं कॅप्शन लिहून पोस्ट केला आहे.

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत गौरीचे सहकलाकार प्रिया मराठे, तेजस बर्वे यांनी देखील तिला अभिनंदन करून नवीन गाडीतून राईड कधी मिळणार? असं विचारलंय.2017 साली आलेल्या ‘रंजन’ चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे कथानक गावातील प्रेम कथेवर आधारीत होते.

गौरी कुलकर्णी मूळची अहमदनगरची आहे. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधून झाले आहे.
पदवीचे पुढचे शिक्षण घेत असलेली गौरी कथ्थक नृत्य कलेत पारंगत असून कॉलेज स्पर्धांमध्ये तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

गौरी कुलकर्णीला वाचनाची आवड आहे. मालिकेच्या सेटवर गौरी जवळ नेहमीच एखादे पुस्तक असते. चित्रीकरणातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ती वाचनात वेळ घालवते.साने गुरुजींचे ‘श्यामची आई’, सचिन पिळगावकर यांचे ‘हाच माझा मार्ग’ ही तिच्या आवडीची पुस्तके आहेत.

काय आहे या मालिकेची कथा:

परदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा आहे.परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंगाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.

Aniket Ghate