या 5 गोष्टी टाळा अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

या 5 गोष्टी टाळा अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

वास्तुशास्त्र आणि पैश्याचे नुकसान यांचे कनेक्शन-वास्तुशास्त्रामध्ये पैश्यांचे नुकसान आणि प्राप्ती यासाठी त्या व्यक्तीच्या आसपासच्या परिस्थितीस जबाबदार मानले गेले आहे. असे म्हटले जाते की जर आपल्या सभोवतालच्या गोष्टी योग्य असतील तर नशीब देखील आपली साथ देत.वास्तुशास्त्रामध्ये अशा 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांची काळजी घेतली नाही तर ते आयुष्यात आर्थिक संकट आणू शकतात. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

फाटलेला खिसा – वास्तुशास्त्रानुसार, फाटका खिसा असणारे कपडे घालून कधीही बाहेर जाऊ नये. असे म्हणतात की फाटलेला खिसा दुर्दैव घेऊन येतो. फाटलेल्या खिशात पैशांची स्थिरता कमी होते. व्यावहारिक दृष्टीने देखील पाहिले तर, खिसा फाटलेला असेल तर पैसे पडण्याची भीती असते. म्हणून, जर खिसा फाटका असेल तर आपण ते कपडे घालणे टाळावे.

फाटलेली पर्स – वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेली आणि रिकामी पर्स ठेवू नये, कारण जर आपण अशी पर्स ठेवली तर ती कधीही पैशाला स्वत: कडे ओढत नाही. म्हणून पर्समध्ये नेहमीच काही पैसे ठेवा आणि जर ते फाटलेली असेल तर ताबडतोब ती बदला. फाटलेली पर्स नकारात्मकता वाढवते, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.

बंद घड्याळ – जर आपले घड्याळ खराब झाले असेल किंवा त्याची बॅटरी कार्य करत नसेल तर ताबडतोब दुरुस्त करा. बंद घड्याळ आपल्याकडे ठेवल्याने नकारात्मकता वाढते. बंद घड्याळला मनगटात बांधू नका किंवा पर्समध्ये ठेवू नका. हे आयुष्यातील स्थिरतेचे देखील प्रतीक आहे, म्हणूनच जीवनात प्रगती करण्यासाठी घड्याळ गतीमान असावे. आपण घड्याळ घालत नसाल तर हे आपल्यावर लागू होत नाही.

जुने तिकीट – वास्तुशास्त्रात नमूद केले आहे की कधीही पर्समध्ये आपल्या जुन्या प्रवासाचे तिकिट ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे अनावश्यक प्रवासाचा योग्य बनतो आणि अनावश्यक खर्च होतो. तसेच, एखाद्याने आपल्या पर्समध्ये किंवा खिशात जुन्या बिलाची स्लिप ठेवू नये. यानेदेखील प्रगती स्थगित होते,आणि अनावश्यक पैसे खर्च होतात.

फाटलेल्या नोटा-फाटलेली नोट कधीही आपल्या खिशात ठेवू नये. खिशात फाटलेली नोट असल्यास अपमानीत व्हावे लागू शकते. वास्तु विज्ञानाच्या अनुसार फाटलेल्या नोटा चिटकून घेतल्या पाहिजेत अथवा घरामध्ये कुठेतरी अश्या ठिकाणी ठेवून दिल्या पाहिजे जिथे आपली नजर जाणार नाही. याशिवाय पिशवी व पर्समध्ये ब्लेड किंवा चाकू ठेवणे देखील टाळले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate