.. म्हणून नदी,तलावांमध्ये नाणी फेकली जातात, यामागचे कारण जाणून तुम्ही देखील त्याचे अनुकरण कराल !

.. म्हणून नदी,तलावांमध्ये नाणी फेकली जातात, यामागचे कारण जाणून तुम्ही देखील त्याचे अनुकरण कराल !

बहुतेक वेळा, बसने किंवा ट्रेनने प्रवास करताना, लोक नद्यांच्या वरून जात असतांना, लोक नद्यांमध्ये नाणी टाकताना आपल्याला दिसतात. अनेक वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा आजही लोक पाळत आहेत, पण नदीत नाणे का टाकले जाते हे आपल्याला माहिती आहे का ?

यामध्ये अंधश्रद्धा नाही

आपण असा विचार करत असावा की ती एक प्रकारची अंधश्रद्धा असेल ज्यामुळे लोक नदीत नाणी टाकतात. आपला हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. या प्रथेमागील एक मोठे कारण आहे. वास्तविक ज्या वेळी नदीत नाणी टाकण्याची ही प्रथा सुरू झाली त्या काळात ते तांब्याचे नाणी टाकत असत.

कारण तांबे हे पाणी शुद्धीकरण्याचे काम करत असल्यामुळे लोक जेव्हा जेव्हा नदीवरून किंवा तलावाच्या आसपास जात असत तेव्हा तांब्याचे नाणी हे पाण्यात टाकत असत. आज, तांबे नाणी प्रचलित नाहीत, परंतु तरीही लोक त्या काळापासून चालू असलेल्या या प्रथेचे अनुसरण करीत आहेत.

एक प्रकारचे दानच जणू

ज्योतिषशास्त्रात असेही म्हटले आहे की जर लोकांना कोणत्याही प्रकारचे दोष दूर करायचे असेल तर त्यांनी नाणी व काही पूजेची सामग्री पाण्यात वाहावी. या बरोबरच ज्योतिषात असेही म्हटले आहे की जर वाहत्या पाण्यात चांदीची नाणी टाकली तर ती अशुभ चंद्रचे दोष संपवते. एवढेच नव्हे तर पाण्यात नाणे टाकण्याच्या प्रथेला एक प्रकारचे दान देखील म्हटले जाते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate