खरंच सोन्यापेक्षा महाग असते का ‘व्हेल’ माशाची उलटी, जाणून घ्या याबाबत रंजक माहिती

कधीकधी लोकांच्या हातात अशी काही वस्तू पडते की त्यांना वाटते की आपण त्या वस्तूमुळे एका झटक्यात श्रीमंत होऊ. तैवानमधील एका माणसाच्या बाबतीतही असेच घडले आहे. निर्जन बेटावर चालत असतांना त्या माणसाला शेणा सारखी कठोर व कोरडी वस्तू दिसली, त्याचा चांगला वास येत होता.
या सुगंधाने आकर्षित होऊन त्याने ते घेतले आणि घरी घेऊन आला. या सुगंधाचा प्रसार करणारा कठोर कचरा नेमकं काय आहे याची त्या व्यक्तीला कल्पना देखील नव्हती? बरेच संशोधन व शोध घेतल्यानंतर कळले की त्याचा हाती 4 किलो शेणाचा खजिना लागला आहे, जो 210,000 डॉलर म्हणजे 1.5 कोटी रुपयांना विकला आहे.
वास्तविक, ते शेणासारख दिसणारी टणक वस्तू व्हेल माशाची उलटी होती. काही दिवसांपूर्वी तैवानच्या न्यूज साइटनेही या घटनेचा अहवाल प्रसिद्ध केला होता. तुम्हाला माहिती आहे का की व्हेल फिशची उलटी सोन्यापेक्षा महाग विकली जातात. चला यामागील कारण जाणून घेऊया …
बरेच शास्त्रज्ञ व्हेलच्या शरीरावरुन निघणाऱ्या या कचऱ्याला उलटी असे म्हणतात आणि बरेचजण त्याला मल देखील म्हणतात. बर्याच वेळा हा पदार्थ गुदाशयातून बाहेर पडतो, तर कधीकधी व्हेल हा पदार्थ मोठा झाल्यावर तोंडातून बाहेर टाकतो. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरर्ग्रिस असे म्हणतात.
व्हेलच्या आतड्यांमधील अॅम्बरग्रिस हा काळा किंवा राखाडी रंगाचा एक घन, मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे. हा पदार्थ व्हेलच्या शरीरात आतून त्याचे रक्षण करतो. व्हेल सहसा समुद्राच्या किनाऱ्यापासून बर्याच अंतरावर राहतो. अशा परिस्थितीत अॅम्बरर्ग्रिसला त्याच्या शरीरातून बाहेर येण्यास बरीच वर्षे लागतात.
समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे हा कचरा एखाद्या गुळगुळीत दगडामध्ये, आणि तपकिरी ढेकूळ मध्ये बदलतो, जो मेणासारखा वाटतो. एम्बरग्रिसचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जातो. यामुळे त्याचे बरेच मूल्य आहे.
एम्बर्ग्रिसपासून बनविलेले परफ्यूम बऱ्याच काळ टिकतात. बरेच शास्त्रज्ञ एम्बर्ग्रिसला तरंगणारे सोने देखील म्हणतात. त्याच्या वजनाबद्दल बोलु तर ते 15 ग्रॅम ते 50 किलो असू शकते. एम्बर्ग्रिस पासून बनविलेले परफ्यूम जगातील बर्याच भागात वापरले जातात. प्राचीन इजिप्शियन लोकांनी एम्बर्ग्रिसकडून उदबत्ती व लाकडी धूप तयार केले होते.
युरोपमधील ब्लॅक काळातील लोकांचा असा विश्वास होता की एम्बर्ग्रिसचा तुकडा एकत्र ठेवल्यास प्लेग थांबविण्यात मदत होते. कारण एम्बर्ग्रिसच्या सुगंधाने हवेतील गंध हा व्यापुन जात होता, ज्यामुळे प्लेग होत नाही असा विश्वास होता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.