‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्यजत्रा’ मधून बाहेर निर्णय

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्यजत्रा’ मधून बाहेर निर्णय

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विनोदी शो हे मराठी मालिकांवर सुरू आहेत. त्यामध्ये चला हवा येऊ द्या हा प्रामुख्याने गाजत आहे, तर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शोदेखील चालत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार काम करत असतात.

डॉक्टर निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर करंडे यासह इतर कलाकारही काम करतात. त्याचबरोबर श्रेया बुगडे ही देखील या शोमध्ये दिसते. आता हास्य जत्रा या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री हा शो सोडून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विनोदी अभिनयाने विशाखा सुभेदार हिने फू बाई फू ,बुलेट ट्रेन, हास्यजत्रा या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आपले स्थान निर्माण केले आहे.

विनोदी अभिनयासोबतच विशाखा आपल्या नृत्यामुळे देखील ओळखली जाते आहे. विशाखा सुभेदार च्या कुर्रर्रर्रर्र या नाटकाचे सध्या रंगभूमीवर प्रयोग सुरू आहेत.या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर ने केले आहे. पॅडी कांबडे, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.

नाटकाची निर्माती देखील विशाखाच आहे.विशाखाने लिहिले आहे की जा आता.. असं म्हणण्यापेक्षा अर्रर्रर्र ऐकायला छान वाटतं मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीचं काम करायचा आहे.मी लवकरच नव्या भूमिकेत दिसले. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातिच्या असचं पाठीशी राहा.

पुढे ती म्हणते मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाही. मी उत्तम विनोदी अभिनेत्री कधीच नव्हते पण दिलेली भूमिका तडीस नेणे त्यात काय वेगळे करता येईल याचा शोध घेऊन ते प्रामाणिकपणे सादर करण्याचा मी प्रयत्न करत असते. विशाखा सुभेदार हिने आता हास्य जत्रेला रामराम ठोकला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली आहे. वेगळ्या धाटणीचा काम करण्यासाठी हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळ्या धाटणीचं काम करण्यासाठी तिने आता हास्यजत्रेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे विशाखाने आपल्या पोस्ट मधून चहात्यांना सांगितले आहे.

चाहतावर्ग विशाखा वर खूप प्रेम करतो. परंतु आता ती त्यांच्या भेटीस कधी येईल, हा मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. विशाखा आणि समीर चौगुले या हास्यजत्रेतील जोडीवर प्रेक्षकवर्ग मनापासून प्रेम करतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.

Aniket Ghate