Video : दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा ढिग अन्…; मालवण बीचवरील घाण पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हातात घेतली झाडू, व्हिडीओ व्हायरल | marathi actress kranti redkar clean up malvan beach share video on social media see details

Video : दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा ढिग अन्…; मालवण बीचवरील घाण पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हातात घेतली झाडू, व्हिडीओ व्हायरल | marathi actress kranti redkar clean up malvan beach share video on social media see details

‘कोंबडी पळाली’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. सध्या अभिनय न करता ती निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. पण चाहत्यांच्या संपर्कात कसं राहायचं हे तिला अचूक ठाऊक आहे. सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तर ती नेहमी एक तरी मजेशीर व्हि़डीओ शेअर करताना दिसते. यामध्ये तिच्या आई-वडिलांचाही सहभाग असतो. आता तिने स्वच्छता मोहिम संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

आपल्या कामामधून वेळ काढत क्रांती तिच्या मुळ गावी मालवणला गेली होती. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने शेअर केले. क्रांती जेव्हा मालवण समुद्रकिनारी पोहोचली तेव्हा तिथला कचरा पाहून तिने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ

समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करतानाचा व्हिडीओही क्रांतीने शेअर केला. यावेळी तिच्याबरोबर इतरही मंडळी होती. व्हिडीओमध्ये कचरा, दारुच्या बाटल्यांचा ढिगही पाहायला मिळत आहे. क्रांतीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “आपण जिथे राहतो तेथील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. आपल्यातील प्रत्येकजण आपल्या आणि आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी जबाबदार आहे.”

आणखी वाचा – एप्रिलमध्ये दिला मुलीला जन्म, आता नऊ महिने पूर्ण न होताच दुसऱ्यांदा आई झाली देबिना बॅनर्जी, म्हणाली, “वेळेपेक्षा आधीच…”

“मी माझ्या मुळ गावी मालवणला गेले आणि तो दिवस खूप सुंदर होता. स्वच्छता मोहिमेसाठी एकत्र येऊन ही मोहिम आपण यशस्वी करूया. मखरेबाग मालवण येथील लोकांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि त्यांचं मिळालेलं सहकार्य याबाबत मी आभार मानते. सिंधुदुर्गातील आपला समुद्रकिनारा सर्वात स्वच्छ बनवूया.” क्रांतीचा हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनी तिच्या या कामाचं कौतुक केलं आहे.

Aniket Ghate