Video : “तू तर सुपरहॉट” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे, व्हिडीओ व्हायरल | marathi actress neha pendse hot look video goes viral on social media see details

Video : “तू तर सुपरहॉट” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे, व्हिडीओ व्हायरल | marathi actress neha pendse hot look video goes viral on social media see details

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मालिका, चित्रपटांपासून दूर आहे. पण तिने आजवर मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. इतकंच नव्हे तर छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १२’ कार्यक्रमामध्येही तिने सहभाग घेतला होता. तसेच इतर हिंदी कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली होती. ‘भाभीजी घर पर है’ ही तिची शेवटची हिंदी मालिका. नेहा तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण तिची ड्रेसिंग स्टाइल विशेष लक्षवेधी असते. तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नेहा ही उत्तम अभिनेत्री आहे. त्याचबरोबरीने तिचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. फॅशनच्याबाबतीत विविध प्रयोग करणं तिला आवडतं. तिने केलेलं प्रत्येक फोटोशूट चर्चेचा विषय ठरतं. आताही नेहाने एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कमालीची हॉट दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. तिच्या संपूर्ण ड्रेसला चंदेरी रंगाचे खडे दिसत आहेत. तसेच या ड्रेसमध्ये नेहाचा फिटनेस दिसून येत आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करताच काही तासांमध्ये याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत.

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरेचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक

नेहाचा नवा लूक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. खूप सुंदर, अगदी हॉट दिसतेस, तुझं सौंदर्य कमालीचं आहे अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींनी टक्कर देणारा नेहाचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Aniket Ghate