ह्या वास्तुदोषामुळे घरात सतत होतात वादविवाद, जाणून घ्या तुमच्या घरात तर नाहीयेत ना ‘हे’ वास्तुदोष

ह्या वास्तुदोषामुळे घरात सतत होतात वादविवाद, जाणून घ्या तुमच्या घरात तर नाहीयेत ना ‘हे’ वास्तुदोष

घरात सुख, शांती आणि आनंद असावा, ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय नको असतांना घरात भांडणे सुरू होतात, ज्यामुळे घरात एक तणावपूर्ण वातावरण तयार होते आणि नात्यात दुरावा यायला सुरुवात होते. यामागे काही वास्तू दोष देखील आहेत, ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि तेच आपल्या घरावर नकारात्मक प्रभाव पाडण्याचा प्रारंभ करतात. तर चला मंग जाणून घेऊया अश्या कोणत्या कारणामुळे घरात अश्या समस्या उद्भवतात.

1) काटेरी झाडे – घरात काटेरी झुडूप असल्याने त्याचा वाईट परिणाम हा घरात होतो आणि कुटुंबातील लोकांवर होतो, या अश्या काटेरी झाडामुळे घरांमध्ये मोठे वादविवाद व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर तुमच्याही घरात काटेरी झाड असेल त्याला आजच घराबाहेर काढा. जेणेकरून घरात भांडणे होणार नाहीत आणि घरात सुख शांती लाभेल.

2) वाळलेली झाडे – जेव्हा घरामध्ये एखादे झाड अचानक सुखायला लागते तेव्हा घरात वास्तू दोष निर्माण होतो. ह्या वाळणाऱ्या झाडांमुळे नात्यांवर नकारात्मक प्रभाव पडायला सुरुवात होते. आणि विनाकारण घरात वादविवाद हे सुरू होतात. त्यामुळे जर घरात कोणतेही झाड वाळायला लागले असेल तर त्याला पाणी टाकून पुन्हा जीवित करा म्हणजे त्याला हिरवागार पणा येईल.

3) नळातुन सतत पाणी टपकणे – नळामधून सतत पाणी जर घरात टिपकट असेल तर ते घरात वास्त दोष घेऊन येते. यामुळे प्रेमातील आणि नातेसंबंधातील आपलेपणा संपायला लागतो आणि नात्यात घरात भांडणे सुरू व्हायला लागतात.

4) तुटलेली काच – तुटलेली काच घरात ठेवल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो आणि नात्यात कटुता निर्माण होते. घरात तुटलेली काच ठेवने हा एक प्रकारचा वास्तुदोषच आहे, ज्यामुळे घरात वाद आणि तणावाचे वातावरण तयार होते.

5) तुटलेली मूर्ती – तुटलेल्या मूर्तीमुळे घरात वास्तूचे दोष उद्भवतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होते. आणि यामुळे घरात कलह उद्भवतो. त्यामुळे जर घरामध्ये तुटलेली मूर्ती असेल तर आजच त्याचे विसर्जन करा. आणि त्याजागेवर नवीन मूर्ती खरेदी करून घरात आना.

तुमच्या घरातही विनाकारण घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे व वादविवाद होत असतील तर, त्यामागे हे वरील कारणे देखील असू शकतात, म्हणून आपल्या घरात ठेवलेल्या अशा गोष्टी घरातून दूर करा आणि घराचे वातावरण चांगले बनवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate