वरून धवने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’, वरून धवनच्या घरी आले…

वरून धवने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’, वरून धवनच्या घरी आले…

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन पुन्हा एकदा काका झाला आहे. वरुण धवनच्या घरी एक लहान सदस्य आला आहे. होय, वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित धवन दुसऱ्यांदा वडील झाला आहे. वरुणची वहिनी जान्हवी धवनने मुलाला जन्म दिला आहे. रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलमधून घरी जाताना दिसत आहे.

डेव्हिड धवनचा मोठा मुलगा रोहित धवन हा चित्रपट निर्माता आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित धवन निळ्या रंगाच्या कॅज्युअल शर्टमध्ये दिसत आहे. तो एकटा नाही त्याच्यासोबत वडील डेव्हिड धवनही देखील आहेत. रोहितला पाहताच त्याचे फोटो काढणाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. रोहितला मुलगा झाल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. रोहित जास्त वेळ तिथे न थांबता गाडीत बसून निघून गेला.

नताशाने पार्टी होस्ट केली होती

मार्चमध्ये वरुण धवनची पत्नी नताशा दलालने वहिनी जान्हवीसाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. अर्जुन कपूरची बहीण अंशुलाही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. अंशुलाने जान्हवीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जान्हवी प्रिंटेड फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे.

रोहित आणि जान्हवीने 7 वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. रोहित आणि जान्हवीला एक मुलगीही आहे. वरुण त्याची भाची नियारासोबतचे फोटो शेअर करत असतो. काका-भाचीची धमाल मस्ती चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

रोहितने देसी बॉईज या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते. रोहित सध्या शहजादा या चित्रपटातवर काम करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, क्रिती सेनन, परेश रावल आणि मनीषा कोईराला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Aniket Ghate