तुषार कपूर म्हणतो, मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा….!!!कारण जाणून धक्का बसेल!!

तुषार कपूर म्हणतो, मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा….!!!कारण जाणून धक्का बसेल!!

बॉलिवूडमध्ये मोजके अभिनेते आहेत, ज्यांनी कधी लग्न केलं नाही. सलमान खान, अक्षय खन्ना यासारख्या आधीच्या पिढीतील अभिनेत्यांसह उदय चोप्रा, अभय देओल, रणदीप हुडा हे कलाकारही अद्याप विवाहबंधनात अडकलेले नाहीत. दुसरीकडे, लग्नाच्या बेडीत न अडकताच काही कलाकारांनी पितृत्वसुख अनुभवलं आहे. अभिनेता तुषार कपूर हा त्यापैकीच एक. नुकतचं तुषारने आपण कधीच लग्न करणार नसल्याचं सांगितलं.

नुकतंच एका मुलाखतीत तुषार कपूरला लग्नावरुन छे ड ण्या त आलं. लग्नाचं प्लॅनिंग करत आहेस का, असा प्रश्न तुषारला विचारला. “मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो” असं तुषार म्हणतो.

“मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वतःला इतरांसोबत शेअर करु शकत नाही. त्यामुळे भविष्यातही मी तसं करणार नाही. जर शेवट चांगला, तर सगळंच चांगलं” असं तुषार म्हणतो. “पेरेंटिंग म्हणजे फक्त डायपर बदलणं नाही, तर निस्वार्थ प्रेम, पालनपोषण आणि मुलांना बिनशर्त पाठिंबा देणं असतं” असं तुषार याआधीही म्हणाला होता.

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. त्याची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही 2019 मध्ये स रो ग सी च्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.

44 वर्षांच्या तुषार कपूरने जून 2016 मध्ये स रो ग सी च्या माध्यमातून पिता होण्याचं सुख अनुभवलं. त्याचा मुलगा लक्ष्य आता पाच वर्षांचा होईल. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांनी स रो ग सी चा पर्याय सुचवल्याचं तुषारने सांगितलं होतं.

तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली. 2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने मनोरंजन विश्वात पाय ठेवलं. कुछ तो है, गायब, खाकी असा काही सिनेमात झळकल्यानंतर क्या कूल है हम या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमधील मू क लकीच्या रोलमुळे तो प्रेक्षकांच्या मनात बसला.

Editor