झी मराठी च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘मन उडू उडू झालं’ नंतर आता ‘ही’ प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

झी मराठी च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘मन उडू उडू झालं’ नंतर आता ‘ही’ प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

झी मराठीवर आलेल्या नव्या मालिकांना प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. हल्लीच सुरू झालेली ‘नवा गडी नवं राज्य’ असो किंवा हल्लीच आलेली ‘दार उघड बये’ या मालिकांना प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

पण चाहत्यांनी अनेकदा प्रतिक्रिया दिली होती की त्यांनी नवा विषय छोट्या पडद्यावर पाहायला आहे. आता झी मराठीवर आलेल्या नव्या प्रोमोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘हृदयी प्रीत जागते’ असं या नव्या मालिकेचं नाव असून ही मालिका ७ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे.आता या मालिकेमुळे कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हृदयी प्रीत जागते या मालिकेमध्ये सिद्धार्थ खिरीड आणि पूजा कातुर्डे ही फ्रेश जोडी दिसणार आहे. पूजाची ही पहिलीच मालिका असून सिद्धार्थने ‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. त्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सिद्धार्थ भोसले याा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, त्यावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले.

दरम्याच गेल्याच महिन्यात त्याने ही मालिका सोडली. आता सिद्धार्थ एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोवरुन यामध्ये भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा मेळ पाहायला मिळणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये म्हटलं आहे की, ‘तो रिदमचा बादशाह ती सुरांची राणी कशी असेल यांची प्रेम कहाणी?’

या मालिकेत सिद्धार्थ आणि पूजा यांच्या पात्रांची नावं अद्याप गुलदस्त्यात असली तरी सिद्धार्थ पाश्चिमात्य संगाीतात तरबेज दाखवण्यात आला आहे तर पारंपरिक संगीत जोपासताना पूजा दिसते आहे. आता या दोघांची लव्ह स्टोरी किती सुरेल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान प्रेक्षकांनी हा प्रोमो समोर येताच मालिकेचे कौतुक केले आहे. अशाच विषयासाठी उत्सुक होतो, अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत. मात्र आता ०८ वाजता ही मालिका दिसणार असल्याने कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या वेळेत सध्या ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षक पाहतात.

त्यामुळे आता स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची ही मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे

Aniket Ghate