पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेस/सकाळी थांबणाऱ्या कंटेनर/मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले पैसे घेतात ?

पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेस/सकाळी थांबणाऱ्या कंटेनर/मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले पैसे घेतात ?

बऱ्याचदा आपण हायवेवर हॉटेल आणि पेट्रोल पंपासमोर मालवाहतूक ट्रक, कंटेनर, छोटी मालवाहू वाहने उभी असलेली पाहतो. आणि आपण मनात बऱ्याचदा असा विचार येतो की पेट्रोलपंप वाला किव्हा हॉटेल वाला यांना इतक्या वेळ कसकाय त्यांच्या गाड्या उभ्या करायला परवानगी देतो. किव्हा ते त्यांना त्याबदल्यात काही पैसे देतात का ?

99.99% पेट्रोल पंप चालक किंवा तेथील कर्मचारी यांच्याकडून पैसे घेत नाहीत. फक्त त्यांच्याकडे एखादा दुसरा रात्रभर ड्युटी करणारा एक अर्धा बिनपगारी वॉचमन असतो. जो रात्री ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी झोपल्यावर त्या थांबलेल्या वाहनामधून कोणी डिझेल किंवा काही वस्तू चोरीला जाणार नाहीत यासाठी रात्रभर पहारा देत असतो.

तसेच ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी झोपण्यापूर्वी तो वॉचमन त्यांना सकाळी किती वाजता जाणार आहात तुम्हाला कधी उठवू असे विचारून घेतो आणि त्या वेळेस तो त्यांना उठवतो त्या बदल्यात ट्रक ड्रायव्हर त्याला थोडेफार पैसे देतात.

असेच हॉटेलच्या परीसरात सुध्दा होते. पंपावर थांबणारे ट्रक हे शक्यतो अशाच पेट्रोल पंपावर थांबतात जिथे ते प्रवासात डिझेल भरतात. बऱ्याच ट्रक ड्रायव्हर लोकांची वेगवेगळ्या मार्गावर डिझेल भरायची ठिकाणे तसेच जेवायची हॉटेल, ढाबे हे ठरलेली असतात. त्याप्रमाणे ते त्यांच्या प्रवासाचे नियोजन करतात. परंतु या बाबतीत ढाबा चालकांचे अर्थकारण थोडे वेगळे असते.

तिथे सुध्दा ड्रायव्हर ढाबा मालकाला नाही तर वॉचमनला पैसे देतात. हे ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी त्या ढाब्यामध्ये हॉटेल मध्ये जेवायला, सकाळी चहा नाश्ता करायला जातात. त्यातुन ढाबा तसेच हॉटेल चालकांना पैसे मिळतात. किंबहुना रात्रीची पार्कींगसाठी सुविधा असेल तरच ट्रक ड्रायव्हर त्या ढाब्यावर हॉटेल वर जेवायला थांबतात.

जास्तीत जास्त ट्रक ड्रायवरांनी आपल्या हॉटेल, ढाब्यावर जेवायला थांबावे यासाठी हॉटेल, ढाबा चालकांकडून ट्रक ड्रायव्हरांना मोफत पार्किंग, बाथरूम टॉयलेट अशा प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. जितकी पार्किंग साठी जागा तितका व्यवसाय जास्त हे समीकरणच बनले आहे. गुजरात मध्ये एका ढाबा चालकाने सुमारे एक हजार ट्रक पार्क होतील एवढी मोठी जागा ढाब्या च्या दोन्ही बाजूंनी आणि मागे भाड्याने घेतली आहे.

ढाब्याच्या एका बाजूने ट्रक आत जातात आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात संपुर्ण जागेला पत्रे लाऊन कंपाऊंड केले आहे तसेच हॉटेल वर एक मोठा एसी हॉल बनवला आहे. तिथे झोपण्यासाठी एका रात्रीसाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी फक्त शंभर रुपये माणसी एवढा अल्प दर ठेवला होता. जर तसेच ट्रक मध्ये दोघांना झोपता येईल अशी सोय कंपनीने किंवा ड्रायव्हर केबीन बनविणाऱ्या वर्कशॉपने केलेली असते परंतु बऱ्याच लांब मार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये तिन जण असतात. त्यामुळे एकाची झोपायची अडचण लक्षात घेऊन त्या ढाबा चालकाने टेरेस वर पत्रा टाकून त्यांची झोपायची मोफत सोय केली आहे.

ज्यांना गरम पाणी अंघोळीला रुपयांना एक बादली उपलब्ध करून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हॉटेल ढाबा परीसरात पानपट्टी पंचरचे दुकान दुरुस्ती साठी गॅरेज ग्रिसींग करणारे तसेच स्पेअरपार्ट विक्रेते बघितले असतील तेथे एक दवाखाना आणि त्याला लागून मेडिकल स्टोअर्स सुध्दा आहे. यासाठी मात्र त्या व्यवसाईकाच्या कल्पकतेची दाद द्यावी लागेल.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate