‘टुथपेस्ट’ वर असणाऱ्या ‘या’ वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मागचे रहस्य

आपण दररोजच टूथपेस्टचा वापर करतो, परंतु यायाबत असणारी बर्याच प्रकारची माहिती आपल्याला माहिती नसते. जसे टूथपेस्टच्या ट्यूबवर असणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या. लाल, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या याबाबत फारच कमी लोकांना माहिती असेल. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
सोशल मीडियावर असे मेसेज फिरत आहेत की ज्यात म्हंटले जात आहे की टूथपेस्टच्या ट्यूबवरील निळ्या पट्टीचा अर्थ म्हणजे ‘औषधी टुथपेस्ट’. हिरवी पट्टी म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक. लाल पट्टी म्हणजे नैसर्गिक आणि केमिकल यांचे मिश्रण. तथापि ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.
आणि अजून एक अशीही अफवा होती की काळ्या रंगाच्या पट्टीच्या टूथपेस्टमध्ये जास्त केमिकल असते, म्हणून ते वापरू नये. त्याचप्रमाणे लाल पट्ट्यासह टूथपेस्टमध्ये असेही सांगितले गेले होते की यात केमिकल देखील आहे, परंतु ते काळ्यापट्टीवाल्या टुथपेस्टपेक्षा थोडे चांगले आहे. इंटरनेटवर शेअर होणाऱ्या या मेसेज मध्ये फक्त निळ्या आणि हिरव्या पट्ट्यां असणारी टूथपेस्ट वापरण्याची शिफारस केली जात आहे.
सायंटिफिक अमेरिकन या वेबसाइटच्या म्हणण्यानुसार जगातील प्रत्येक गोष्ट तांत्रिकदृष्ट्या एक केमिकल आहे. सर्व नैसर्गिक गोष्टी यासुद्धा एका प्रकारचे केमिकल स्वरूपाच्या असतात. अशा परिस्थितीत केमिकल किंवा बिगर केमिकल उत्पादनांचा प्रश्नच उद्भवत नाही.
वास्तविक, टूथपेस्टच्या ट्यूबवर बनविलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मानवांसाठी निरुपयोगी आहेत, याचा आपल्या मानवाच्या आरोग्याशी संबंध लावणे हे चुकीचं आहे.
मुळात रंगीत मार्क हे ट्युब उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा आणि टुथपेस्टमधील रसायनांची मात्रा यांचा काहीही संबंध नसतो. रंगीत मार्कला “आय मार्क्स” म्हणतात. ट्युबला कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची मशीनला सूचना करण्याचे काम हे मार्क्स करीत असतात. त्यामुळे रंगावरून कोणती टुथपेस्ट आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे हे सांगणारा मेसेज जर आपल्याकडे आला तर त्याला बळी पडू नका.
कोलगेट कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा कलर मार्क/कोड विषयक मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. कोलगेटने दिलेल्या माहितीनुसार, ट्युबवरील रंगीत मार्क हे लाईट सेन्सरला ट्युबचा शेवट कुठे आहे याची माहिती देतो, जेणेकरून ट्युब तयार करणाऱ्या मशीनला नेमके कुठे कापायचे आणि कुठे सील करायचे हे कळते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.