तेजश्री करतीये या अभिनेत्याला डेट, स्वतः केला खुलासा,फोटो पाहून धक्का बसेल!!!

तेजश्री करतीये या अभिनेत्याला डेट, स्वतः केला खुलासा,फोटो पाहून धक्का बसेल!!!

2021 हे वर्ष मराठी सेलिब्रिटींसाठी खास ठरतंय. या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अगदी कोरोनाच्या काळातही कोरोनाच्या सर्व नियम पाळत किंवा स्वतः इतरांसमोर आदर्श ठेवून कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधली. यातच आणखी एका अभिनेत्रीच्या डेटची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री तेजश्री प्रधान.

तेजश्री प्रधानचा नुकताच 2 जूनला वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाकरता तिचा सहकलाकार अभिनेता आशुतोष पत्कीने खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये आशुतोषने आपल्या भावना अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत.

काय आहे आशुतोषची खास पोस्ट

माझी प्रिय बेस्ट फ्रेंड…. मला तुला हे सांगायचंय तू माझ्यासाठी खूप काही आहेस. कायमच तू माझ्या मनात असतेस. मला तू आतापर्यंत जे प्रोत्साहन दिलंस त्यासाठी खरंच मनापासून आभार. तुझ्यामुळे मी एक चांगला माणूसच नाही तर उत्तम अभिनेता देखील बनलोय. तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडे दोन टीप्स आहेत.

भूतकाळ विसर कारण आपण तो बदलू शकत नाही. आणि दुसरी टीप म्हणजे गिफ्ट विसरून जा… ते मी तुझ्यासाठी आणलंच नाही. Happy Birthday . यापोस्टसोबत आशुतोषने या दोघांचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. सध्या याच फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

तेजश्रीने दिलं आशुतोषला खास उत्तर

तेजश्री प्रधान म्हणतेय की,’तुझी मी एखादी टीप विसरेन. पण गिफ्ट… कधीच नाही.’ सध्या यांची ही पोस्ट आणि फोटो बघून हे दोघं डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत तेजश्री प्रधाननं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. गेल्या वर्षी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तेजश्री तिच्या अभिनयासाठी मोठ्या पडद्यावरही नावलौकिक मिळवत आहे.

Team Hou De Viral