कलाकार आणि अभिनेत्री खरोखर चुंबन घेतात का? ते चुंबन दृश्य कसे चित्रित करतात?

कलाकार आणि अभिनेत्री खरोखर चुंबन घेतात का? ते चुंबन दृश्य कसे चित्रित करतात?

काही वेळा कथेची गरज म्हणून नायक आणि नायिकेचे खरोखरचे चुंबनदृश्य चित्रित केले जाते,कारण तशी उत्कटता दिग्दर्शकाला त्यातून दर्शवायची असते.तर कधी नायकाच्या चेहऱ्यापुढे नायिकेचा चेहरा दाखवितात आणि नायिकेकडून डोळे बंद करून चुंबनदृश्य देत असल्याचे हावभाव चित्रित केले जातात.

आजकाल कॉम्पुटर ग्राफिक्सच्या मदतीने किंवा ग्रीन स्क्रिन इफेक्टस वापरून चुंबनदृश्य चित्रित केले जाते. दोघांच्या चेहऱ्यामध्ये एक हिरव्या रंगाचा बलून ठेवला जातो, नायक आणि नायिका त्या बलूनला चुंबन देतात नंतर ग्राफिक्सच्या मदतीने बलून हटवला जातो आणि नायक नायिका एकमेकांना चुंबन देतांना पडद्यावर आपल्याला दिसतात.

कदाचित विश्वास बसणार नाही पण महिलांनी चित्रपटात काम करणे ज्याकाळी कमी लेखले जाई त्या काळी ‘देविका राणी’ ह्या अभिनेत्रीने 1933 साली आलेल्या चित्रपटात सलग चार मिनिटांचे चुंबनदृश्य देऊन खळबळ उडवून दिली होती.तो चित्रपट होता ‘कर्मा’!

विचार करा,भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 14 वर्षे आधी हा चित्रपट रिलीज झाला होता.आजच्या काळातही सेन्सॉर बोर्ड चुंबनदृश्याला आक्षेप घेत असते तेव्हाची काय परिस्थिती असेल.त्याकाळी भारतीय मानसिकता आजच्याइतकी सरावलेली नव्हती त्यामुळे खूप गहजब उडाला.

‘कर्मा’ हा एक द्विभाषिक चित्रपट होता. देविका राणी आणि तिचे पती हिमांशू राय यांनी त्यात भूमिका निभावल्या होत्या. भारत,जर्मनी आणि युनायटेड किंगडम यांच्या सहयोगातून या चित्रपटाची निर्मिती झाली होती.68 मिनिटांचा हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांमध्ये बनला होता. वडिलांचा विरोध झुगारून एक राजकन्या शेजारच्या राजपुत्राच्या प्रेमात पडते असा काहीसा विषय ह्या चित्रपटाचा होता.

माहिती सौजन्य – प्रशांत पाटील

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate