करिना कपूरने तैमूर आणि भाची इनायाचे नवीन घरातले फोटो केले शेअर..

करिना कपूरने तैमूर आणि भाची इनायाचे नवीन घरातले फोटो केले शेअर..

करीना कपूरने त्यांच्या नवीन घरातला तिचा मुलगा तैमूर आणि त्याची चुलत बहीण इनाया नौमी खेमू बरोबर बसून आनंद लुटत असतानाचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. बॅकग्राउंडमध्ये सैफ अली खान आणि कुणाल खेमू देखील दिसत आहेत.

करीना आणि सैफ अली खानने अलीकडेच त्यांची बहीण सोहा अली खान आणि तिच्या कुटुंबीयांना त्यांच्या नवीन घरी आमंत्रित केले होते. करीनाने पूलमध्ये थंड पाण्याचा आनंद घेतानाचे तैमूर आणि इनाया चे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

इंस्टाग्रामवर हे चित्र पोस्ट करताना करिनाने लिहिले की, “हे अमेझिंग नाही तर काय आहे? #टीमअँडइन्नी(तैमूर आणि ईनाया) . PS: बरं, मागची मुलेही फारशी वाईट नाहीत.” असे सैफ आणि कुणाल ला संबोधत ती म्हणाली.

मनमोहक चित्रात तैमूर आणि इनाया एकमेकांच्या बाजूला बसून कॅमेराकडे हसत हसत पाहताना दिसतात . दोघेही एका टेबलाजवळ उघड्या टेरेस भागात बसलेले दिसत आहेत. हे दोघेही बाथ रोब मध्ये आणि टॉवेल्समध्ये आहेत, बहुधा पोहण्याच्या बेत असू शकतो. त्यांचे वडील, सैफ आणि कुणाल खेमु मागे बसून सोफ्यावर संभाषण करताना दिसले.

फोटोला काही मिनिटांत प्रचंड प्रेम मिळाले. एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की, “टिमचे स्मित पहा”, तर दुसर्‍याने टिप्पणी दिली की, “खूप सुंदर आहे.”

काही दिवसांतच दुसरे मूल जन्मायची शक्यता असलेली करीना सैफ आणि तैमूरसमवेत आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. ती सध्या तिच्या विविध ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेसमध्ये व्यस्त आहे आणि तिला शनिवारी वांद्रे येथे पिवळ्या कफतानामध्ये स्पॉट करण्यात आले. तिच्यासमवेत अनेक स्टाफ मेंबर होते.

करिनाने आधीच तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन घराचे दर्शन दिले आहे. हे तिच्या जुन्या घरापासून जवळच आहे आणि आकारात खूप मोठे आहे, तसेच तैमूरसाठी एक विशेष खोली देखील आहे.

इंटिरियर डिझायनर दर्शनी शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखतीत सांगितले होते की, “सैफ आणि करिनाचे नवीन घर जुन्या घराचे विस्तारीत स्वरूप आहे. त्यांना फॉर्च्युन हाइट्स मधील घर अत्यंत आरामदायक वाटले आहे; त्यांना घर शोधण्यासाठी कुठे बाहेर जायचे नव्हते.”

म्हणूनच, ज्या नवीन घरामध्ये ते लवकरच प्रवेश करणार आहेत, त्यास जुन्या घराची प्रतिकृती मानता येईल. हे घर लवकरच नवीन बाळाच्या आगमनासाठी त्यांची नवीन घराची आवश्यकता देखील पूर्ण करते. घरात बाळासाठी एक सुंदर नवीन नर्सरी आहे, आणि तैमूरसाठी स्वतःची जागा आहे. त्यांच्या जुन्या घरापेक्षा ती खूपच मोठी आहे; हे सुंदर टेरेस, पोहण्याचा तलाव आणि लँडस्केप केलेल्या मोकळ्या जागांसह अधिक प्रशस्त आहे. यात प्रत्येकासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. “

Aniket Ghate