जर तुम्हाला स्वप्नात ही गोष्ट दिसली असेल तर सावधान, या मागे असू शकतो काही संकेत!!

जर तुम्हाला स्वप्नात ही गोष्ट दिसली असेल तर सावधान, या मागे असू शकतो काही संकेत!!

स्वप्न फक्त योगायोग नसतात, तर आपली मानसिक स्थिती ते दर्शवत असतात. स्वप्न एक नैसर्गिक घटना आहे आणि यावर स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीचं नियंत्रण नसतं. विशेष बाब म्हणजे जी व्यक्ती स्वप्न पाहते, त्याचा कुठलं स्वप्न पाहायचं यावर कुठलंच नियंत्रण नसतं. स्वप्न भूतकाळ किंवा वर्तमान काळातील घटनांचं प्रतिबिंब असतं.

किंवा भविष्यातील काही घटनांबाबत ते संकेत पण देतात. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. आज आम्ही सांगतोय की, स्वप्नात पावसात भिजण्याचा काय अर्थ होतो.

साधारणपणे पावसात फसलो असल्याचं स्वप्न बघणं आपल्या मनाची उदासिनता दर्शवते. कारण पावसाच्या वेळी सूर्य दिसत नाही आणि वातावरण बदललेलं असतं. असं म्हटलं जातं की, सूर्यप्रकाशाचं प्रमाण कमी होतं आणि ती व्यक्त नाराज राहते. याशिवाय पावसामुळे कुठेही जाणं-येणं पण कठीण होऊन जातं.

अशाप्रकारच्या स्वप्नामुळे मिळतात संकटाचे संकेत- मुसळधार पावसात आपल्याला समोरचं काही दिसत नाही. म्हणून, जर आपण स्वत:ला पावसात फसलेलं बघत असाल, तर याचा अर्थ असा पण होऊ शकतो की, आपण कुठल्यातरी त्रासात किंवा विचारात आहेत.

जसं की, आपण बँकचं कर्ज घेतलं आणि ते फेडण्यासाठी आपल्याजवळ खूपच कमी पैसे आहेत. आपल्याला कळत नाहीय की, कर्ज कसं फेडायचं. अशा नैराश्यमय परिस्थितीत आपल्याला पावसात फसण्याचं (भिजण्याचं) स्वप्न दिसू शकतं.

असं अनेकदा होतं की, जेव्हा आपण निराश असता, मात्र याचं कुठलंही स्पष्ट कारण नसतं. हे मुख्य म्हणजे मानसिक आरोग्याची वाईट स्थितीमुळे पण होत असतं. आपला मेंदू आपल्या भावना एखाद्या स्वप्नाच्या रूपात प्रतिबिंबित करत असतात, जे आपली वर्तमान परिस्थिती शिवाय दुसरं काहीच नसतं.

दुसऱ्या काही कारणांमुळे पण आपण स्वत:ला पावसात फसलेलं स्वप्न पाहू शकता. या परिस्थितीत अनेकदा आपल्या परीक्षेचा काळ असू शकतो. बस लक्षात ठेवा की, काहीच कायम राहणार नसतं. जर संकटांचा काळ असेल तर तो पण निघून जाणार असतो.

तर दिवसभरात घडलेल्या घटना किंवा आपल्या मनातील एखादी सुप्त इच्छा पण आपल्याला स्वप्नात दिसते. मात्र या सर्वांचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ देऊ नये. स्वप्नाचा अर्थ चांगला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण स्वप्नाचा अर्थ वाईट असेल तर त्याचाही वाईट परिणाम आपल्यावर होऊ न देता. त्याचा सामना धाडसानं करावा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate