रोजच्या रोज सोप्या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी?

रोजच्या रोज सोप्या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी?

मित्रांनो रोजच्या रोज स्वामीची सोप्या पद्धतीने नित्यसेवा कशी करावी. हा प्रश्न प्रत्येक किंवा सेवेकरी विचारत असतो कारण त्यांना हे जाणून घ्यायचे असते. की मोठी सेवा करणे आम्हाला जमत नाही. या धावपळीच्या जगामध्ये पहिला कामाला महत्त्व द्यावे लागते. आमची इच्छा असून देखील आम्हाला वेळ देता येत नाही.

जो काही थोडाफार वेळ मिळतो. त्या वेळेमध्ये आम्ही स्वामींची सेवा करू शकतो. दहा पाच पंधरा मिनिटांची स्वामींची सोप्या आणि साध्या पद्धतीने कोणत्या सेवा आहेत का. ती सेवा आम्ही करू शकतो. तर हो स्वामींना आपला दिलेला एक मिनिट देखील पुरेसा आहे.

\मात्र ह्या एक मिनिटाच्या सेवेमध्ये आपला विश्वास आणि आपली श्रद्धा पूर्णपणे महाराजांवर असायला पाहिजे. गुण विश्वासाने आणि श्रद्धेने केलेली सेवा स्वामींना प्रसन्न करून देते.

सध्याचे 21 वे शतक हे खूप धावपळीचे आणि कामाचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती कामांमध्ये गुरफटलेला आहे. आणि या धावपळीमध्ये सर आपण आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असे म्हटले तर आपली ही सेवा लाख मोलाची असते. आजच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणती स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता येणार आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ही सेवा आपल्या प्रत्येकाला करता येण्यासारखे आहे. त्याचबरोबर ही सेवा करण्यासाठी खूप वेळ देखील लागणार नाही. या धावपळीच्या जगामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ कोणतीही एक वेळ ठेवून आपल्याला हे एक सेवा करायची आहे. आता या सेवेमध्ये आपल्याला काय करायचे आहे.

तर या सेवेमध्ये आपल्याला दोन गोष्टी करायचे आहेत. यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला ११ माळी जप करायचा आहे. आणि ज्यांना अकरा मुळीच जप करणे शक्य नाही. त्यांनी किमान एक माळी जप तरी दररोज करावा. आणि यानंतर आपल्याला तारक मंत्र एक वेळेस म्हणायचा आहे.

फक्त या दोन गोष्टी आपल्याला करायचे आहेत. एक म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा ११ माळी जप जर ११ माळी जमत नसेल तर एक वेळेस करावा. आणि स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र एक वेळेस म्हणावा फक्त या दोन गोष्टीच आपल्याला नित्यसेवेमध्ये करायचे आहे.

ही सेवा संध्याकाळी किंवा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी केली तरी चालते. किंवा संध्याकाळी ऑफिस वरून कामावरून आल्यावर केली तरी चालते. मात्र हे आपल्याला दिवसातून एकदा करायचे आहे. ही सेवा करत असताना वेळ निश्चित करायची आहे.

सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळच्या संध्याकाळी या वेळेमध्ये बदल करायचा नाही. रोजची एकच वेळ असायला हवी. आणि त्या वेळेमध्येच आपल्यालाही नित्यसेवा केली पाहिजे. मित्रांनो ही सोपी आणि सरळ साध्या पद्धतीची सेवा दररोज नित्यनेमाने आपल्याकडून झाली पाहिजे.

या धावपळीच्या जगामध्ये आपल्याकडून ही नित्यसेवा रोज झालीच पाहिजे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संकटातून महाराज आपली सुटका करतील. आणि सदैव आपल्या पाठीशी राहतील. ही सेवा अगदी साधी आणि सोपी सुटसुटीत आहे. आणि ही प्रत्येकाला करणे शक्य आहे. त्यामुळे ही सेवा आपण देखील करू शकता.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam