खूपचं सुंदर आहे सुनील बर्वे यांची पत्नी, करते ‘हे’ काम

खूपचं सुंदर आहे सुनील बर्वे यांची पत्नी, करते ‘हे’ काम

नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांना भुरळ पाडणारे अभिनेते सुनील बर्वे प्रचंड लोकप्रिय आहेत. सुनील बर्वे यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडते.

सुनील बर्वे इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलेच सक्रिय असून त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांची पत्नी दिसायला खूपच सुंदर असून त्यांचे अनेक फोटो त्यांच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

सुनील बर्वे यांच्या पत्नीचे नाव अपर्णा असून त्या दोघांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुनील बर्वे यांनी मुंबईतील गोरेगाव येथील पाटकल कॉलेजमधून बीएससीची पदवी घेतली. अपर्णा बर्वे अकरावी इयत्तेत असताना सुनील बारावी इयत्तेत होते. सुनील यांनी कॉलेज पूर्ण केल्यानंतर ते काही दिवस मेडिकल रिप्रेजेंटेटीव्हची नोकरी करत होते. पण नोकरीत मन न रमल्यामुळे सुनील यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटकर महाविद्यालयाबाहेर विश्वास नामक हॉटेल आहे. तिथे एकेदिवशी अपर्णा त्यांच्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करत होत्या. तिथे सुनील यांनी प्रथम अपर्णा यांना पाहिले आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. अपर्णा यांनी त्यांच्या हातात त्यांच्या नावाचं एक ब्रेसलेट घातलं होतं, त्यावरुन सुनील यांना त्यांचे नाव अपर्णा असल्याचं समजलं.

सुनीलने कसाबसा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा अपर्णा यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. कशीबशी ओळख वाढवत सुनील यांनी अपर्णासोबत मैत्री केली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी काही वर्षांनी लग्न केले.

अपर्णा या सॉफ्टवेअर क्षेत्रात कामाला आहेत. अपर्णा आणि सुनील यांना सानिका आणि अथर्व ही दोन मुलं आहेत.

Aniket Ghate