आजपर्यंत मुलं जे घाणेरडं काम करायची, आता तेच काम या दोन अभिनेत्री करणार, पाहून बसेल धक्का

आजपर्यंत मुलं जे घाणेरडं काम करायची, आता तेच काम या दोन अभिनेत्री करणार, पाहून बसेल धक्का

मुलं आणि मुली समानतेचं वारं कितीही वाहत असलं तरी आजही मुलींना बघून छेडछाड करणारी, त्यांच्यावर टोमणे मारणारी मुलं दिसतातच. मुलींना बॉडी शेमिंगवरून मुलांचे टोमणे ऐकावे लागतात. पण कल्पना करून बघा, रस्त्यावर एखादा मुलगा निघालाय आणि त्याच्या बॉडी शेपवरून दोन मुली त्याला ऐकू जाईल असे टोमणे मारत आहेत.

हे चित्र कसं वाटेल? आजपर्यंत मुलींच्या बाबतीत जे मुलं करायचे तेच काम आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यादोघी करणार आहेत. डबल एक्सएल हा त्यांचा नवा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित होताच सिनेमात मुली कशा मुलांना टोमणे मारून हैराण करतील याची झलक पहायला मिळाली.

डबल एक्सएल या सिनेमाची कथा ही मुली कशाप्रकारे मुलांना छेडतील, त्यांना बॉडी टाइपवरून बोलतील आणि त्यामुळे मुलींना होणारा त्रास मुलांना समजू शकेल यावर बेतलेली आहे. हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी या सिनेमात पहायला मिळणार आहे. आजपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मुली आणि महिलांच्या बॉडी शेप, फिगर, साइजवरून अनेक विनोद केले जातात. पुरूष अशा महिलांवर टोमणे मारतात. हेच काम महिलांनी पुरूषांच्या बाबतीत केलं तर काय होईल हे दाखवणारा हा सिेनमा आहे.

टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महिला नेटकऱ्यांनी तर हा विषय पडद्यावर कधी एकदा पाहायला मिळेल अशी उत्सुकता कमेंटमध्ये केली. टीझरमध्ये हुमा आणि सोनाक्षी एका बेंचवर बसलेल्या दिसत आहेत. पुरुषांच्या वाढलेल्या पोटावर, चरबीवर त्या टोमणे मारत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महिलांची कंबर बारीक हवी म्हणणाऱ्या पुरुषांकडेही अशाच काही मागण्या केल्या तर काय करतील असा प्रश्नही त्या विचारत आहेत.

डबल एक्सएल सिनेमासाठी हुमा आणि सोनाक्षी यांनी वजन वाढवलं आहे. कारण त्यांना या सिनेमात स्थूल दिसायचं होतं. सोनाक्षीने सिनेमासाठी २० किलो वजन वाढवयाचं म्हणून खाण्यावर भर दिला. १४ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. समाजात मुलींना बॉडीशेमिंगवरून छेडणाऱ्या मुलांवर बॉडीशेमींग कमेंट करण्यासाठी हुमा आणि सोनाक्षी सज्ज झाल्या आहेत.

Team Hou De Viral