माहिती आहे का तुम्हाला ??? तुमच्या आवडत्या कलाकारांचे एका पोस्टसाठी मिळणारे मानधन!!!

माहिती आहे का तुम्हाला ??? तुमच्या आवडत्या कलाकारांचे एका पोस्टसाठी मिळणारे मानधन!!!

आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळेत. पण या कलाकारांना एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोट्यावधी रुपये मिळतात हे माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया कोणत्या बॉलिवूड कलाकाराला एक सोशल मीडिया पोस्टसाठी किती पैसे मिळतात…

अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर 24.8 मिलियन फॉलोवर्स आहेत त्यांना एक पोस्ट टाकण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये मिळत असल्याचे म्हटले जाते

बॉलिवूडचा बादशहा किंग खान शाहरुख याचे सोशल मीडियावर 24.1 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि त्याच्या एका पोस्टसाठी तो १ कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.

क्रिकेटपटू विराट कोहलीचे 94.6 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि विराट त्याच्या एका पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

प्रियांका चोप्राचे 60.1 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि ती तिच्या एक पोस्टसाठी २ कोटी रुपये घेते असे सांगण्यात आले आहे

अभिनेत्री आलिया भट्टचे 50.7 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि ती तिच्या एक सोशल मीडिया पोस्टसाठी १ कोटी रुपये मिळत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

Aniket Ghate