‘लग्नाची बेडी’ मालिकेतील ‘सिंधू’ चा खरा नवरा बघा

‘लग्नाची बेडी’ मालिकेतील ‘सिंधू’ चा खरा नवरा बघा

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या अनेक कलाकार हे वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसत आहेत, तर काही कलाकार हे आपले आयुष्याचे प्रश्न देखील मिटवताना दिसत आहेत. म्हणजे जसे की अनेक कलाकार लग्न देखील करत आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना महामारीचा मोठा उद्रेक झाला होता. या कालावधीमध्ये अनेक कलाकारांनी आपले छंद जोपासले. अनेक कलाकार हे घरीच वास्तव्यास होते, तर अनेक कलाकारांनी आपले लग्न देखील आटोपून घेतले. यामध्ये आपल्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नाव घेत येईल.

सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षीच लग्न केले. त्याचप्रमाणे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करणारा अभिनेता संजय पाटील याने देखील लग्न केले त्याने. त्याने घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील पुष्पा नाम समजके फ्लावर्स समजे क्या, फायर है में हा डायलॉग उखाणा पद्धतीने खूप गाजत आहे.

टिपक्याची रांगोळी या मालिकेत काम करत असलेला अभिनेता चेतन वडनेरे हादेखील लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. चेतन आणि त्याची गर्लफ्रेंड ऋतुजा धारप यांचे फोटो काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आता ते देखील लग्नगाठीत अडकणार असल्याची सांगता येते.

आता लग्नाची बेडी या मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री देखील विवाहाबद्दल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अभिनेत्रीचे नाव सायली देवधर असे आहे. सायली देवधर हिने अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे. जुळून येती रेशीमगाठ ही तिची एक गाजलेली मालिका आहे.

त्याचप्रमाणे लग्न पहावे करून ही मालिकाही तिची लोकप्रिय ठरली होती. त्याचप्रमाणे मिस मॅच, या मालिका आणि चित्रपटातील लोकप्रिय झाली होती. सायली ही अतिशय जबरदस्त अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर सक्रिय असते. आता लग्नाच्या बेडीत काम करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली लग्नाची बेडी या मालिकेतील सिंधू सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. नुकतचं मालिकेत सिंधूचे राघवसोबत लग्न झालं आहे. अभिनेत्री सायली देवधर ही विवाहित असून तिचा नवरा हा एक सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहे. त्याचं नाव आहे गौरव बुरसे असे आहे.

सायली आणि गौरव हे दोघे 14 फेब्रुवारी 2020 मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न बेडीत अडकले. गौरवने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तसेच काही अल्बमही त्याने संगीतबद्ध केले आहेत, तर तुम्हाला सायली देवधर आणि गौरव यांची जोडी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा.

Aniket Ghate