हे ‘5’ मंदिर आहेत भारतातील सर्वात जास्त ‘श्रीमंत’ मंदिर, एका वर्षाला इथे येते करोडोरुपयांची देणगी

हे ‘5’ मंदिर आहेत भारतातील सर्वात जास्त ‘श्रीमंत’ मंदिर, एका वर्षाला इथे येते करोडोरुपयांची देणगी

अयोध्यात भव्य राम मंदिर बांधण्यासाठी नुकत्याच झालेल्या भूमिपूजनानंतर प्रस्तावित मंदिराच्या भव्यतेचा आपल्याला अंदाज हा आलेलाच असेल. मंदिराच्या संरचनेची किंमत (राममंदिर बजेट) जवळपास 300 कोटी रुपये असल्याचे समजले आहे, तर उत्तर प्रदेश सरकार त्याच्या आवारात 500 कोटींचा प्रकल्प तयार करत आहे.

राम मंदिराचा पहिला शिला (वीट) 326 कोटी रुपयाची होती, हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असू शकते का? मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण आज देशातील सर्वात श्रीमंत मंदिरे कोणती आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

पद्मनाभ स्वामी मंदिर – केरळच्या तिरुवनंतपुरमधील पद्मनाभ स्वामी हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. असे म्हणतात की त्याच्या 6 तिजोरीत असणारी मालमत्ता एकूण 20 अब्ज डॉलर्स एवढी आहे. येथे असलेली महाविष्णू देवाची मूर्ती पूर्णपणे सोन्याची आहे. त्याचे एकूण मूल्य 500 कोटी असल्याचे म्हटले जाते. त्याच्या मालमत्तेसंदर्भात बरेच वादंग निर्माण झाले हिते आणि यात कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला होता.

तिरुपती तिरुमला बालाजी मंदिर – तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचे नाव देखील देशातील सर्वात पूज्य आणि श्रीमंत मंदिरांमध्ये येते. दररोज सुमारे 60 हजार भाविक दर्शनासाठी येथे येतात. असे म्हणतात की या मंदिराची वार्षिक कमाई 650 कोटी रुपये आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, तिरुपती बालाजी मंदिरातलने 2010 मध्ये स्टेट बँकेत 1175 किलो ग्रॅम सोने जमा केले होते.

शिर्डीचे साई बाबा मंदिर – महाराष्ट्रातील अहमदनगर येथील शिर्डी साई बाबा मंदिर देखील बरेच लोकप्रिय आहे. दरवर्षी लाखो लोक परदेशातून येथे येतात. शिर्डी साई संस्थेच्या अहवालानुसार दान म्हणून मंदिरात वर्षाकाठी 480 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची बातमी यापूर्वी मिळाली होती, परंतु ताज्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी 360 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

वैष्णो देवी मंदिर – जम्मूमधील माता वैष्णो देवी मंदिर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. वर्षभर येथे हजारो लोक येतात. एका अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे 80 लाख लोक वैष्णो देवी मंदिराला भेट देतात. टूर माय इंडिया डॉट कॉमनुसार श्रद्धा मंडळाला भाविकांच्या देणग्यामधून वार्षिक 500 कोटी रुपये मिळतात.

सिद्धिविनायक मंदिर – मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक सामान्य, विशेष आणि प्रसिद्ध व्यक्ती इथे दर्शनाला येतात. सहसा दररोज 25 हजार लोक या मंदिरात येतात. गणेश चतुर्थीला येथे येणार्‍या लोकांची संख्या लाखोंच्या आसपास असते. EDटाईम्सनुसार, या मंदिरास दरवर्षी भक्तांच्या देणग्यामधून सुमारे 75 ते 125 कोटी रुपये मिळतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate