श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा ‘या’ मंत्राचा जप : मनातील इच्छा लगेच पूर्ण होईल !

श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा ‘या’ मंत्राचा जप : मनातील इच्छा लगेच पूर्ण होईल !

मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये करा या मंत्राचा जप तुमच्या मनातील कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होईल. श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये महादेवाची विशेष सेवा पूजा केली जाते. पारायण करतात कोणत्याही स्तोत्राचे वाचन करतात. मंत्र जप करतात. या श्रावण महिन्यामध्ये भरपूर देवांची सेवा केली जाते. कारण श्रावण महिना हा पवित्र आणि पावन महिना आहे.

असे मानले जाते की, श्रावण महिन्यामध्ये केलेले कोणतेही काम पूर्ण होते. देवांची केलेली सेवा देवांपर्यंत पोहोचते.
म्हणून श्रावण महिन्यामध्ये बरेच उपाय मंत्र जाप स्तोत्राचे वाचन केले जाते देवांना प्रसन्न करून घेतले जाते. श्रावण महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे लाभ लवकरात लवकर मिळतात. त्यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यामध्ये या मंत्राचा जप करा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

हा उपाय श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी केला तरी चालतो. किंवा सोमवारच्या दिवशी केला तरी चालतो. या मंत्राचा जप आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या मूर्ती समोर करू शकतो. किंवा आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर घरामध्ये देखील आपण हा उपाय या मंत्राचा जप करू शकतो. हा मंत्र खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राच्या जपाने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील.

आपण ज्या मंत्राचा जप करणार आहोत, त्या मंत्राचा जप आपल्याला माळेने करायचा आहे. ही माळ रुद्राक्षाची असायला हवी. जर आपल्या घरामध्ये रुद्राक्षची मान नसेल तर आपल्या घरामध्ये जी कोणतीही जपाची माळ आहे. त्या माळेने आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. जर आपल्याला रुद्राक्षाची माळ मिळत असेल किंवा आपल्याकडे असेल तर आपल्याला या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेनेच करायचा आहे.

तुम्ही ज्या मंत्राचा जप करणार आहात त्या मंत्राचा जप आपल्याला संपूर्ण एक म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे. या मंत्राचा जप सोमवारच्या दिवशी केला तर खूपच चांगले असते. मंत्राचा जप करण्याआधी तुम्हाला दूध आणि साखरेचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. या मंत्राचा जप आपण सकाळी संध्याकाळी केव्हाही करू शकतो. एक वाटीभर दूध घ्यायचे आहे.

आणि त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आहे. साखर आणि दुधाचा नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. आपले दोन्ही हात जोडून स्वामींना, महादेवांना विनंती प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. सुख-समृद्धी लाभावे. यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर मगच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे, तो मंत्र असा आहे.

॥ महामृत्युजय मंत्र॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम। उर्वारुकमिवबन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात॥

हा मंत्र काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल हा मंत्र खूप प्रभावशाली आणि चमत्कारी मंत्र आहे. या मंत्राच्या जपानी आपल्या सर्व इच्छा लगेचच पूर्ण होतील. हा मंत्र आपल्या आरोग्यासाठी घराच्या अडचणीसाठी सर्व काही दूर होते. फक्त भक्ती भावाने आणि श्रद्धेने या मंत्राचा जप करा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील, त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि आपलं जे काही हवे आहे ते सर्व मिळेल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral