‘तेव्हा तशी तू’ मधील ‘अनामिका’ खऱ्या आयुष्याबाबत, परिवार, खरे नाव व मानधन

‘तेव्हा तशी तू’ मधील ‘अनामिका’ खऱ्या आयुष्याबाबत, परिवार, खरे नाव व मानधन

सध्या झी मराठीवर तेव्हा तशी तू ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेमध्ये स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर हे दिसले आहेत. शिल्पा तुळसकर ही गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. शिल्पा तुळसकर हिने अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे.

शिल्पा तुळसकर हिने सगळ्यात आधी बोमकेश बक्षी 1993 मध्ये आलेल्या या मालिकेत काम केले होते. यामुळे तिने तुलसी नावाचे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने दूरदर्शनवर शांती या मालिकेत रांजनाची भूमिका केली. ती 1994 मध्ये आली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याचबरोबर तिने देवकी या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटात काम केले होते.

2005 मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटातील तिची भूमिका देखील लोकप्रिय झाली होती. 2008 मध्ये आलेल्या काल चर्चा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती. लेडीज स्पेशल हा सोनी टीव्हीवरील तिचा प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याच बरोबर तिचा दिल मिल गये, देवो के देव महादेव यासारख्या मालिका देखील लोकप्रिय आहेत.

शिल्पा तुळसकर हिने नाईन मलबार हिल या मालिकेतही काम केले होते. त्यानंतर वीर शिवाजी या मालिकेमध्ये जिजाबाईची भूमिका साकारली होती. रिश्ते मधील चौदाव्या भागांमध्ये ती दिसली होती. यासोबतच हिरो, भक्ती ही शक्ती है या मालिकेतही तिने काम केले. शांती या मालिकेतील तिची भूमिका गाजली होती.

टीचर ही झी टीव्हीवरील मालिका ही लोकप्रिय झाली होती. हद कर दी या मालिकेतील भूमिका लोकप्रिय झाली होती. जर्सी नंबर टेन, कैसा ये प्यार है, लेडीज स्पेशल, भास्कर भारती, चांद छुपा बादल मे, देवो के देव महादेव, हिरो, हंगामा टीव्ही, क्यू होता है प्यार, जाना ना दिल से दूर, एक दीवाना था, ये है मोहब्बते, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा, दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ ना, मेरे साई श्रद्धा और सबुरी यासारख्या मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

आता शिल्पा तुळसकर ही तू तेव्हा तशी या मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. शिल्पासोबत या मालिकेमध्ये स्वप्निल जोशी हा अनेक दिवसानंतर दिसला. हे शिल्पा तुळसकर हिने याआधी देखील अनेक चित्रपटातही काम केले आहे. तिने काम केलेले चित्रपट हिट झाले आहेत.

सनई-चौघडे, मुझसे फ्रेंडशिप करोगे, क्रेजी फोर, भातुकली यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. तिने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले. शिल्पा तुळसकर आता तू तेव्हा तशी या मालिकेत जबरदस्त अशा भूमिकेत दिसत आहे. शिल्पा तुळसकरचे शिक्षण मुंबईतच झाले आहे.

तिचा जन्म 1977 मधला आहे. तिच्या पतीचे नाव विशाल शेट्टी आहे, तर तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिची एकूण संपत्ती अडीच कोटी रुपयांची आहे. प्रत्येक भागासाठी ती 50 हजार रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते.

Aniket Ghate