बुर्ज खलिफात ५० कोटींचा फ्लॅट अन् समुद्रकिनाऱ्यावर आलिशान बंगला, पहा शिल्पा शेट्टीची प्रॉपर्टी!!

बुर्ज खलिफात ५० कोटींचा फ्लॅट अन् समुद्रकिनाऱ्यावर आलिशान बंगला, पहा शिल्पा शेट्टीची प्रॉपर्टी!!

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी मागील सोमवारी अ ट क केली. तेव्हापासून कुंद्रा हे चर्चेत आहेत.आजच म्हणजेच २७ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन को ठ डी मध्ये पाठवण्यात आलं आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना दोन मुलं आहेत. वियान कुंद्रा आणि मुलगी समिषासोबत हे दोघे मुंबईमधील जूहूतील एका आलीशान घरामध्ये राहतात.कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीच्या घराप्रमाणेच मुंबईमधील हे घरही अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे.

त्याचबरोबर कुंद्रा यांनी दुबईमध्येही एक आलीशान बंगला घेतलाय. या बंगल्यामध्येही अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. पाहुयात याच बंगल्याचे काही खास फोटोदुबईजवळच्या एका बेटावर शिल्पा आणि राज यांनी हे व्हेकेशन होम घेतलं आहे.

शिल्पा आणि राज या दोघांनाही महागड्या लाइफस्टाइलची सवय आहे. राज कुंद्राही अनेकदा पत्नीच्या इच्छेप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात असं त्यांनी मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याच अलिशान गोष्टींमध्ये दुबईतील या घराचाही समावेश होतो.

बुर्ज खलीफामधील या फ्लॅटची किंमत ५० कोटी रुपये इतकी होती असं सांगण्यात येतं. मात्र हा फ्लॅट अजूनही शिल्पाकडे आहे की नाही याची माहिती उपलब्ध नाही. २०१५ मध्ये हा फ्लॅट विकल्याची माहिती समोर आलेली मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.

दुबईमधील सर्वात महागड्या ठिकाणी शिल्पा आणि राज यांचा हा बंगला आहे. पाम जुमेराह परिसरामध्ये हा बंगला आहे. अनेकदा शिल्पा आणि राज सुट्ट्यांमध्ये या बंगल्यावर वास्तव्यासाठी येतात. हा दुबईमधील सुट्ट्यांदरम्यान शिल्पाने पोस्ट केलेला त्यांच्या बंगल्यातील फोटो आहे.

राज आणि शिल्पा यांचा जुहूमधील बंगलाही दुबईच्या बंगल्याइतकाच आलीशान आहे.शिल्पा बऱ्याच वेळा योगाचे व्हिडीओ बंगल्यामधील गार्डनमध्येच शूट करते.योगा करण्यासाठी शिल्पा आणि राजच्या मुंबईतील बंगल्यात एक खास जागा आहे.

शिल्पाने मुंबईतील घराच्या गार्डनमध्ये भाज्या लावल्या आहेत.त्याच्या मुंबईतील घरात जीम, मोठे गार्डन, थिएटर असल्याचे दिसत आहे.मात्र त्याचवेळी निवांतपणा असावा म्हणून घराला जिथे जिथे शक्य आहे तिथे पॅनरोमा व्ह्यू असणाऱ्या बाल्कनीही आहेत.

Team Hou De Viral