अखेर आनंद दिघेंच्या ‘धर्मवीर’ ने करूनच दाखवलंच

(Dharmaveer) धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चर्चा देशभरामध्ये सध्या आहे. ठाण्यातील ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मुख्य भूमिकेत आपल्याला प्रसाद ओक (Prasad Oak) हे दिसले आहेत. प्रसाद हे अतिशय हुबेहूब आनंद दिघे यांच्या सारखेच या चित्रपटात दिसत आहेत. त्यांच्या मेकअप मॅन खरी कमाल केली आहे. अनेकांना ते ओळखू येत नाहीत. असे वाटते की आनंद दिघे आले आहेत. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच एक मोठा विक्रम केला आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, आदित्य ठाकरे, सलमान खान अमिषा पटेल यांच्या उपस्थितीमध्ये ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलर अतिशय भव्य दिव्य होता. या आधी देखील या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता.

प्रसाद ओक याचा रांगडा बाणा या चित्रपटामध्ये जबरदस्त असा दिसत आहे. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर असलेले एक गाणी सध्या या चित्रपटातील लोकप्रिय होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी या चित्रपटाची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच एक विक्रम नोंदवला आहे. याबाबत प्रसाद ओक यानेच ही माहिती दिली आहे. हा विक्रम असा की, मुंबईतील वांद्रे येथे आशिया खंडातील सगळ्यात मोठे होल्डिंग आहे. या होल्डिंगवर धर्मवीर चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहे. 16800 स्क्वेअर फिट मध्ये हे होर्डिंग्ज आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे, असे प्रसाद याने सांगितले आहे.

विशेष म्हणजे या आधी कुठल्याही मराठी चित्रपटाचे पोस्टर यावर लागले नव्हते. प्रसाद याने सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, प्रचंड अभिमान.. आशियातल्या सर्वात मोठ्या होल्डिंगवर धर्मवीर अवतरले आहेत.

धर्मवीर 13 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.. एका धगधगत्या अग्निकुंडाची चित्रगाथा.. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे.. अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टला देखील अनेकांनी लाईक आणि शेअर केले आहे.

Aniket Ghate