तुम्ही कसे झोपता यावर तुमची से क्स लाईफ अवलंबून असते,विश्वास नाही मग हे एकदा नक्की पहाच!!!

तुम्ही कसे झोपता यावर तुमची से क्स लाईफ अवलंबून असते,विश्वास नाही मग हे एकदा नक्की पहाच!!!

उत्तम आरोग्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच चांगली झोपही आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर, अनेक त्रास उद्भवतात. आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांना ब्लडप्रेशर सारखे हृदयाशी संबंधित त्रास व्हायला लागतात.

याशिवाय लैं गि क आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञांच्यामते व्यक्तीने 6 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. त्यांच्यामते पूर्ण झोपेबरोबरच आपण ज्या स्थितीमध्ये झोपतो त्या स्थितीचा परिणाम देखील आपल्या आरोग्यावरही होत असतो.

पूर्ण झोपेची आवश्यकता

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. झोप चांगली झाली तरच आपली इम्युनिटी चांगली राहते. जर्नल ऑफ एक्सपेरिमेन्टल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार रात्री चांगली झोप घेणार्‍या लोकांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते.

पोटावर झोपा

बऱ्याच लोकांना पोटावर म्हणजेच उपडं झोपायला आवडतं. तज्ज्ञांच्यामते पोटावर झोपल्यामुळे घोरण्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय स्लिप अ‍ॅपनिया असलेल्या लोकांना या प्रकारे झोपल्याने फायदा मिळतो. पोटावर झोपतांना मान अखडणार नाही याकडेही लक्ष द्यावं लागतं. बऱ्याच वेळा पोटावर झोपणाऱ्या लोकांना मानदुखीचा त्रास होतो.

पाठीवर झोपा

पाठीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मणका,स्नायू आणि सांधे यांचा आरोग्य चांगलं राहतं. मात्र, ज्यांना पाठदुखी, स्लीप अ‍ॅपनिया किंवा घोरण्याची सवय आहे अशा लोकांना पाठीवर झोपणं कठीण जातं. तज्ज्ञांच्यामते सरळ झोपण्याची सवय असलेल्या लोकांची गुडघेदुखी, कंबरदुखी पासून सुटका करण्यास मदत होते.

कुशीवर झोपणं

बऱ्याच वेळा लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांना कुशीवर झोपायला आवडतं. मात्र, यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. ग र्भ व ती महिलांना कुशी झोपण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. शिवाय घोरणाऱ्या लोकांनी देखील कुशीवर झोपावं. मात्र, ज्यांना कुशीवर झोपल्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होतात त्यांनी सरळ झोपणचं चांगलं.

Team Hou De Viral