घरात ‘येथे’ ठेवा एक तांब्या पाणी: सर्व दरिद्रता घराबाहेर जाईल, लक्ष्मी प्राप्ती होईल !

घरात ‘येथे’ ठेवा एक तांब्या पाणी: सर्व दरिद्रता घराबाहेर जाईल, लक्ष्मी प्राप्ती होईल !

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी घरामध्ये येथे ठेवा एक तांब्या भरून पाणी घरातील दरिद्रता नकारात्मक शक्ती बाहेर जाईल. घरामध्ये सुख , समाधान, बरकत राहील. घरामध्ये शांतता राहील आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये राहील. आपण जर गुरुवारच्या दिवशी एक तांब्या पाणी जो तांब्या आपण देवपूजेसाठी घेतो तो तांब्या आपल्याला घ्यायचा आहे.

आणि त्यांच्याकडे देवपूजेचा तांब्या नसेल त्यांनी आपल्या घरातील तांब्या घेतला तरी चालतो. आणि हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. संध्याकाळची देव पूजा करतो, त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याभर शुद्ध पाणी घ्यायचे आहे.

संध्याकाळची पूजा आपल्याला सहानंतर आणि सातच यादी करायची आहे. आणि आपण जे तांब्याभर पाणी घेतलेले आहे, तो तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. तो तांब्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता घालायच्या आहेत. त्यानंतर दिवा लावून अगरबत्ती ओवाळायची आहे.

आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातून सर्व दारिद्र्य दुःख नकारात्मक शक्ती जे काही वाईट आहे. ते सर्व निघून जाऊ दे. वाईट ऊर्जा, कटकटी, भांडण, तंटे सर्वकाही नष्ट होऊ दे. असे मनापासून व श्रद्धेने म्हणायचे आहे. आणि देवघरा समोरून उठायचे आहे.

किंवा आपली इतर कोणती सेवा इतर पूजा असेल तर ती करायची आहे. आणि तो तांब्या गुरुवारच्या रात्रभर तो देवघरामध्ये ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या देवपूजा करायचे आहे. देवपूजा करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावावी. आणि त्यानंतर तो तांब्या तेथून घ्यावा.

आणि त्यातील पाणी आपल्या घराच्या बाहेरील बाजूस किंवा ज्या ठिकाणी वर्दळ नाही, अशा ठिकाणी ते पाणी ओतायचे आहे. हे पाणी वर्दळीच्या ठिकाणी अजिबात सांडायचे नाही. ते पाणी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी वर्दळ असेल कोठेतरी कोपऱ्यात ते पाणी बघायचे आहे. किंवा ते पाणी आपण कोणत्याही झाडाला वतू शकतो.

चुकूनही ते पाणी तुळशीच्या झाडाला वतायचे नाही. तुळशीचे झाड सोडून कोणत्याही झाडाला आपण ते पाणी वतू शकतो. आणि जर आपल्या आजूबाजूस झाडे नसतील तर एका साईटला कोठेही वतावे. असा हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे.

एक तांब्या पाणी आपण आपल्या घरातून बाहेर घेऊन जाऊ, त्यावेळी आपल्या घरातील अडचणी कटकटी, दारिद्र्य, नकारात्मक ऊर्जा सर्वकाही त्या पाण्यासोबत निघून जाईल. आणि आपल्या घरामध्ये शांतता, सुख, समाधान येईल.ज्यावेळी आपण हा उपाय करणार आहोत. यावेळी आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवे.

कोणतेही उपाय करत असताना विश्वासानेच करावे म्हणजे त्यामध्ये आपल्याला येते. गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांना आवडीचा दिवस आहे. गुरूवारच्या दिवशी आपण जी काही स्वामींची सेवा करू किंवा उपाय करू त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात. त्यामुळे हा उपाय आपण गुरुवारीच करायचा आहे.

एक तांब्याचा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो. किंवा महिन्याच्या कोणत्याही एका गुरुवारी केला तरी चालतो. हा उपाय खूपच प्रभावशाली आहे. अनेक जणांनी हा उपाय करून याचा लाभ करून घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ करून घेऊ शकता.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate