प्रकरण अंगलट ! प्रसिद्ध डान्सरला होणार अटक

प्रकरण अंगलट ! प्रसिद्ध डान्सरला होणार अटक

हल्लीच्या जमान्यामध्ये डान्स शोला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आपल्या भारतामध्ये अशी काही कलाकार आहेत की, ज्यांच्या डान्स शो आणि गाण्याच्या शो ला आवर्जून आजही गर्दी होत असते. यामध्ये आपल्याला प्रख्यात संगीतकार, गीतकार, गायक ए आर रहमान यांचे नाव घेता येईल.

रहमान यांचे लाईव्ह शो आजही होतात. त्यांच्या चेन्नई मधले लाईव्ह शोला अफाट अशी गर्दी होत असते. त्याचप्रमाणे बाहेर देशात देखील ते लाईव्ह शो करत असतात. तसेच आपण सपना चौधरी हे नाव ऐकले असेल. सपना चौधरी ही गायिका व डान्सर आहे. आपल्या अनोख्या अदाकारीने ती वेळ प्रेक्षकांची मने जिंकून घेत असते.

सपना चौधरीचे लटके-झटके पाहण्यासाठी अनेक लोक तासनतास ताटकळत असतात. मात्र, आता या सपना चौधरी विरोधात एक अटक वॉरंट जारी करण्यात आली असल्याचे कळते. सपना चौधरीने यावरून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, तिचा अर्ज फेटाळण्यात आला. सपना चौधरी ही कायमच चर्चेत असते.

बिग बॉस या शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने अतिशय जबरदस्त असा खेळ केला होता. या शोनंतर तिची खूपच चर्चा झाली होती. काही दिवसापूर्वी परळी येथे देखील तिचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. येथे देखील कोरोना महामारीचे सगळे नियम उल्लंघन करून तिचा शो पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

एक मे 2019 रोजी सपना चौधरी हिच्यावर विश्वासघात आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 20 जानेवारी 2019 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन जुनेद अहमद, युवान आली, रत्नाकर उपाध्यय आणि अमित पांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 13 ऑक्टोबर 2019 मध्ये लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम होता.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन शुल्क आकारण्यात आले. प्रतिव्यक्ती तीनशे रुपये देण्यात आले. हजारो लोकांनी तिकीट काढले होते. मात्र, सपना चौधरी रात्री दहा वाजेपर्यंत आलीच नाही. त्यामुळे लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आयोजकांनी तिकिटाचे पैसे सर्वांना परत केले. त्यानंतर याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली होती आणि हे प्रकरण कोर्टात पोहोचले.

आता याच प्रकरणात सपना चौधरी हिच्या विरोधात अटक वॉरंट बजाण्यात आले होते. आपल्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी तिने नुकताच कोर्टात हजेरी लावली. मात्र तिने याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती आणि कुणालाही काही कळू दिले नाही.

Team Hou De Viral