सानिया मिर्झा म्हणते, या ‘क्रिकेटपटू’ कडे पाहून मला माझ्या नवऱ्याची आठवण येते !

सानिया मिर्झा म्हणते, या ‘क्रिकेटपटू’ कडे पाहून मला माझ्या नवऱ्याची आठवण येते !

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपील निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीला बरेच जणं शुभेच्छा देत आहेत. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने तर धोनीला शुभेच्छा देताना, त्याला पाहिलं तर मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, असं विधान केलं आहे.

सानियाने धोनीच्या निवृत्तीबाबत एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये सानिया धोनीबद्दल बरंच काही बोलली आहे. धोनीने निरोपाचा सामना खेळावा की नाही, धोनी हा अन्य क्रिकेटपटूंपेक्षा नेमका कसा वेगळा आहे, त्याचबरोबर धोनीला पाहिले की मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, असेही सानियाने म्हटले आहे.

सानिया म्हणाली की, ” धोनीने जर ठरवलं असतं तर तो आपला निवृत्तीचा सामना खेळला असता. पण धोनीने शांतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घेतली, हीच धोनीची गोष्ट सर्वात वेगळी आहे. या गोष्टीमुळेच धोनी हा बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. माझ्यामते या अशा काही गोष्टीच धोनीला कॅप्टन कूल बनवतात. धोनीने स्वत:साठी नाही तर देशासाठी बरेच काही केले आहे.

देशाला बऱ्याच गोष्टी धोनीने मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे धोनीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.”धोनीबद्दल काही गोष्टी सानियाने सांगितल्या आहेत. धोनीची तुलना सानियाने आपला पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर केल्याचेही पाहायला मिळत आहे.

याबाबत सानिया म्हणाली की, ” धोनीला पाहिले की मला माझ्या नवऱ्याची आठवण होते. कारण धोनी आणि शोएब यांची पर्सनॅलिटी सारखीच आहे. त्याचबरोबर धोनी आणि शोएबमध्ये बरेच गुण सारखे आहेत. त्यांच्यामध्ये बरीच समानता आहे. मैदानातही धोनी आणि शोएह नेहमीच शांत राहीलेले आहेत. त्यामुळे धोनी हा काही गोष्टींमध्ये शोएबसारखाच आहे.

“भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रमाणे महेंद्र सिंह धोनीचे करिअर, त्याचे कर्णधापद आणि विकेटकिपिंग यांना वेगळे स्थान आहे. त्याच प्रमाणे त्याच्या निवृत्तीला वेगळे स्थान मिळाले आहे.

शनिवारी संध्याकाळी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धोनीने निवृत्ती जाहीर केली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला एकच धक्का दिला.

Aniket Ghate