‘या’ काही सवयीमुळे संपत्ती होते तुमच्यापासून दूर, देवीलक्ष्मी देखील सोडून देते साथ

‘या’ काही सवयीमुळे संपत्ती होते तुमच्यापासून दूर, देवीलक्ष्मी देखील सोडून देते साथ

जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे? तर बहुतेक लोकांचे उत्तर असे असेल की त्यांना त्यांच्या जीवनात सर्व सुख, संपत्ती, सुख सुविधा आणि आरामा हवाय असे ते सांगितील. तसे, बघायला गेलं तर या सर्व गोष्टी मानवाच्या गरजेच्याच आहेत.

प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता पडू नये. कुटुंबातील सर्व लोकांचे जीवन योग्य प्रकारे चालावे. धर्मग्रंथानुसार देवी लक्ष्मी ही अशा प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य प्रदान करते. जर तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास असेल तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला कधीच अभाव जाणवणार नाही.

लक्ष्मी जी नेहमी अश्या घराची निवड करतात जिथे नेहमी शुद्ध लोक, धर्माच्या मार्गावर चालणारे लोक आणि चांगल्या सवयी असलेले लोक असतात.आज आम्ही तुम्हाला अशाच काही वाईट सवयींबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे धनाची देवी लक्ष्मीजी नाराज होतात. या वाईट सवयींमुळे माणसाची संपत्ती नष्ट होते. शास्त्रांनुसार एखादी व्यक्तीचे या वाईट सवयीमुळे त्याचे धन संपती सुख कमी होऊन जाते.

शास्त्रानुसार मनुष्याच्या या सवयी वाईट मानल्या गेल्या आहेत

1) हिंदू धर्मग्रंथानुसार दान, भोग आणि नाश यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्यास त्याने त्यातल्या काही सुविधा धन संपत्ती काही गरजूंना दान देत नसेल तर अश्या लोकांच्या बाबत काही काळानंतर संपत्ती कमी व्हायला सुरुवात होते.

2) शास्त्रानुसार ज्याला आपल्या संपत्तीचा अति अभिमान आणि जास्त गर्व होतो त्याचे धन नष्ट होते. म्हणून, आपल्या पैशाबद्दल विसरूनही अति अभिमान किव्हा अतिगर्व बाळगू नका. आणि त्याबद्दत एक म्हण देखील प्राचिलीत आहे ‘गर्वाचे घर नेहमी खाली असते’

3) शास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याच्या आळशीपणा असतो. होय, जी व्यक्ती आळशी असते त्यासोबत लक्ष्मीजी कधीही थांबत नाही. आळशी लोक नेहमी त्यांची कामे करण्यापासून लांब पळताना. आळशी माणूस प्रतेक काम हे उद्यावर ढकलून टाळतो. यामुळे आळशी माणसाकडे असलेले धन हि नष्ट व्हायला सुरुवात होते. देवी लक्ष्मी नेहमी कर्म आणि कर्तव्यदक्ष लोकांवर दया करते आणि त्याच लोकांवर आपला आशीर्वाद देते.

4) शास्त्रात असे नमूद केले आहे की जर एखाद्याला पैशाची इच्छा असेल तर त्याने दिवसा कधीही झोपू नये कारण लक्ष्मी दिवसा झोपलेल्यांकडे कधीच येत नाही. अशा लोकांची संपत्ती लवकरच संपते.

5) गर्व असणाऱ्या व्यक्तीसोबत लक्ष्मी कधीही राहत नाही. रावणाचाही या कारणास्तव नाश झाला होता. या कारणास्तव, जो व्यक्ती खूपच गर्व करतो त्या व्यक्तीची नेहमीच पडझड होते.

6) क्रोधामुळे माणसाची संपत्ती नष्ट होते असे शास्त्रात नमूद केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीत स्वत: वरचा ताबा गमावला आणि त्याला अधिक राग आला तर त्याची संपत्ती नष्ट होते. राग हा भुतांचा गुण मानला जातो. रागामुळेच राक्षस हे देवतांकडून हरले होते. म्हणूनच, तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Aniket Ghate