बॉलिवूड पून्हा दुःखात ! प्रसिद्ध खलनायकाचे 70 व्या वर्षी दुःखद निधन

बॉलिवूड पून्हा दुःखात ! प्रसिद्ध खलनायकाचे 70 व्या वर्षी दुःखद निधन

गेल्या दीड-दोन वर्षांपासून भारतामध्ये विशेष करून बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. यामध्ये आपल्याला इरफान खान पासून ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक कलाकारांचा नाव घेता येईल. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्याने अंतिम श्वास घेतला आहे.

काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध गीतकार संगीतकार प्रसून जोशी यांच्या आईचे दुखद निधन झाले होते. त्यांची आईदेखील प्रसिद्ध अशी कलाकार होती. दोन ते तीन महिन्यापूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हे देखील रुग्णालयात दाखल आहेत.

गेल्या वर्षीच्या सुमारास सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे देखील कॅन्सरने निधन झाले. त्याचप्रमाणे इरफान खान देखील आपल्याला सोडून गेले आहेत. गेल्या महिन्याच्या सुमारास बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले. त्यांच्यावर आणि दिवस उपचार सुरू होते. आता बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जबरदस्त काम करणारे अभिनेते यांचेही निधन झाले आहे.

या अभिनेत्याचे नाव सलीम घोष असे होते. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अंतिम श्वास घेतला. याबाबत त्यांचे कुटुंबातील सदस्य शारीक हाश्मी यांनी माहिती दिली आहे. सलीम यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. त्यांनी काम केलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. कोरोना काळामध्ये त्यांच्या भूमिका या अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या.

सलीम यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते. आपला आवाज आणि जबरदस्त अशा अभिनयाने त्यांनी अनेकांना मंत्रमुग्ध केले होते. पण त्यानंतर त्यांना अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम मिळाले. सगळ्यात आधी त्यांनी सुबह या मालिकेत काम केले. त्यांची ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर त्यांनी अनेक मालिका चित्रपटात काम केले. 1978 मध्ये त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली होती. स्वर्ग नर्क या चित्रपटात त्यांनी जबरदस्त असेच काम केले होते. या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर त्यांनी चरखा, सारांश, मोहन जोशी हाजीर हो या सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता.

सलीम घोष यांनी टिपू सुलतान, भारत एक खोज, कृष्णा आणि वागळे की दुनिया यासारख्या मालिकांमधून देखील जबरदस्त असे काम केले होते. आता त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे, तर आपल्याला सलीम घोष यांनी काम केलेला कुठला चित्रपट आवडला आम्हाला नक्की सांगा.

Aniket Ghate