‘सैराट’ मधील मंग्याची झालीये वाईट हालत, जगण्यासाठी करावं लागतंय ‘हे’ काम

‘सैराट’ मधील मंग्याची झालीये वाईट हालत, जगण्यासाठी करावं लागतंय ‘हे’ काम

काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट आला होता. सैराटने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये प्रचंड धुमाकूळ घालून दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मराठीतील एवढा व्यवसाय करणारा हा पहिला चित्रपट ठरला.

चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले. नागराज मंजुळे यांनी आपल्या अफलातून कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. नागराज याने याआधी चित्रपट व लघुपटाची निर्मिती केली आहे. त्या चित्रपटाच्या आधी त्यांनी पिस्तुल्या हा लघुपट केला होता. हा खूप चालला होता. त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यानंतर त्यांनी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेम कथा दाखवली. आर्ची आणि परश्या यांची ही प्रेम कहाणी होती. एक गरीब वर्गातील मुलगा- उच्चवर्णीय तरुणीसोबत प्रेम करतो आणि त्यानंतर ऑनर किलिंग शेवटी दाखवण्यात आले आहे.

या धर्तीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये प्रचंड कमाई केली होती. रिंकू राजगुरु हिने आर्चीची भूमिका साकारली होती, तर आकाश ठोसर याने या चित्रपटात परशाची भूमिका साकारली होती. त्यानंतरही हे दोघे एका चित्रपटात एकत्र दिसले. सैराट चित्रपटामध्ये आर्ची-परश्या यांच्यासोबतच इतर भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या होत्या.

या चित्रपटातील सगळ्याच भूमिका या प्रेक्षणीय अशा झाल्या. या चित्रपटात आर्ची हिच्या मामाच्या मुलाची भूमिका करणारा मंग्या हा देखील लोकप्रिय ठरला होता. क्रिकेट खेळताना त्याला अजिबात हालचाल करता येत नाही. त्यामुळे परश्या त्याला भदाड्या म्हणतो आणि त्याचे या चित्रपटात भदाड्या म्हणून अनेकांनी उदो उदो केला.

या चित्रपटामध्ये मंग्याची भूमिका अभिनेता धनंजय ननावरे याने साकारली आहे. धनंजय ननावरे हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता आहे. धनंजय या चित्रपटानंतर पुन्हा कुठल्याही चित्रपट किंवा मालिकेत दिसला नाही. या चित्रपटातील त्यांची भूमिका ही लक्षवेधी झाली होती.

सोशल मीडियावर आर्ची आणि मंग्या यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या बद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. सैराट चित्रपटानंतर धनंजय हा चांगभलं या शो मध्ये दिसत होता. मात्र त्यानंतर तो परत कुठेच दिसला नाही. रुपेरी पडद्यावर मंग्या याला प्रेक्षक पुन्हा पाहण्यास उत्सुक आहेत.

एका बातमीनुसार धनंजय सध्या अतिशय अडचणीत जगत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर आर्थिक अडचण आली आहे आणि तो उपजीविका करण्यासाठी मिळेल तो काम करत असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे मध्यंतरी किराणा दुकानात तो मजुराचे काम करताना दिसत होता.

सध्या तो चालकाचे काम करत असल्याचे समोर आले होते. यावर चा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यामुळे नागराज मंजुळेने आता मंग्या म्हणजे धनंजय ननावरे याच्याकडे लक्ष देऊन त्याला आर्थिक हातभार लावावा, अशी मागणी देखील समोर येत आहेत.

Aniket Ghate