‘सैराट’ फेम प्रसिद्ध अभिनेता देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रुग्णालयात दाखल

‘सैराट’ फेम प्रसिद्ध अभिनेता देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रुग्णालयात दाखल

काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. मराठी मधील हा शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने अफाट यश मिळवल्यानंतर या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना देखील मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

या चित्रपटात आर्ची आणि परशा यांची कहाणी दाखवण्यात आली होती. या चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू तर परशा ही भूमिका अभिनेता आकाश ठोसर याने साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते.

नागराज मंजुळे यांची देखील या चित्रपटामध्ये भूमिका आहे. नागराज मंजुळे हे दिग्दर्शकासोबत उत्तम अभिनेते देखील आहेत. अनेक चित्रपटांमध्ये त्या छोट्या मोठ्या भूमिका करत असतात. काही वर्षापूर्वी आलेल्या फॅन्ड्री या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

समाजातील वंचित घटकावर आधारित चित्रपट बनवणे याकडे नागराज मंजुळे यांचा अधिक कल दिसतो. कारण आजवरचे त्यांचे सर्व चित्रपट अशाच धाटणीचे झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेला झुंड देखील असा चित्रपट होता. झुंड चित्रपटात झोपडपट्टीतील मुलांची कहाणी त्यांनी दाखवली आहे. या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांना देखील त्यांनी घेतले होते.

मात्र, या चित्रपटाचा ज्याप्रमाणे गव गवा झाला त्याप्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे नागराज मंजुळे यांना आता आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा ट्रॅक बदलावा लागणार आहे, असे देखील जाणकार सांगत आहेत. एकाच धाटणीचे चित्रपट बनवल्याने तुमच्यावर तसाच शिक्का बसतो, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

वेगवेगळे प्रयोग करावे, असे देखील अनेक जण म्हणत असतात. सैराट चित्रपट एवढा गाजला होता की, या चित्रपटातील सल्ल्या लंगड्या यांच्या भूमिका ही प्रचंड गाजल्या होत्या. नंतर मात्र या कलाकारांना काही खास भूमिका मिळाल्या नाही. हे कलाकार सहज कधीही उपलब्ध होऊ शकतात. मात्र रिंकू राजगुरू हिला मात्र मागणी होती. कागर या चित्रपटात तिने भूमिका केली होती.

मात्र अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तिचे ग्लॅमर थोडे कमी झाल्याचे पाहायला मिळाले, तर महेश मांजरेकर यांनी आकाश ठोसर याला एका चित्रपटात संधी दिली होती. मात्र, त्याचा तोही चित्रपट आपटला. सुरुवातीच्या काळामध्ये रिंकू राजगुरू ही बॉडीगार्ड घेऊन रस्त्यावर फिरायची. मात्र, आता तिच्या मागे कोणीही नसते, असे चित्र आहे.

सध्या तिच्याकडे काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. सध्या सैराट चित्रपटात काम करणारा लंगड्या हा गंभीर आजारी असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. लंगड्या याच्यावर सध्या डॉक्टर अमेय ठाकूर हे उपचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून त्याचे पोट हे खूप दुखत होते. त्यामुळे त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.

यामध्ये काही दोष आढळले आहेत. मात्र उपचारानंतर तो बरा होईल, असे देखील ठाकूर यांनी सांगितले आहे. लंगड्या ही भूमिका अभिनेता तानाजी गलगुंडे याने केली होती. तानाजी हा आता लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या बाबतीतली बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना प्रकृतीतून बरा होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

Rushikesh Kadam