सैफ अली खान ला आजही होत आहे हे चित्रपट नाकारल्या चा पश्चाताप!!!!

सैफ अली खान ला आजही होत आहे हे चित्रपट नाकारल्या चा पश्चाताप!!!!

सैफ अली खान हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे आणि आजकाल तो फक्त चित्रपटच नव्हे तर तांडव या वेब सिरीज मूळेही चर्चेत आहे. सैफ मधे कुठल्याही प्रतिभेची कमतरता नाही, याचा पुरावा त्याच्या हिट चित्रपटांवरुन आणि हिट वेब सीरिज वरुन मिळतो.

तथापि, सैफने आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. त्याने बरेच उत्तम चित्रपट केले, पण असे काही हिट चित्रपट त्याच्या हातातून गेले ज्यामुळे कदाचित तो तिन्ही खानांपेक्षा(शाहरुख, सलमान आणि आमीर) सुपरस्टार बनला असता.

कधी वेळ नसल्यामुळे तर कधी काही वयक्तिक अडचणीमुळे सैफने अनेक चित्रपटांना नकार दिला, जे चित्रपट पुढे जाऊन बॉलिवूडचे सर्वात सुपरहिट चित्रपट असल्याचे सिद्ध झाले. आपण त्या दोन चित्रपटांबद्दल जाणून घेऊ ज्यांना नाकारल्या चा आजही सैफला पश्चात्ताप होत आहे.

दिल वाले दुल्हनियाँ लें जायेंगे:

या चित्रपटातील राज आणि सिमरनची प्रेमकथा कोणीच विसरू शकत नाही. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये युरोप आणि दुसर्‍या भागात भारत दाखविला गेला. लोकांना चित्रपटाच्या कथेपासून रंगवलेल्या पात्रानं पर्यंत सर्व काही आवडले. शाहरुख आणि काजोलने राज आणि सिमरन यांचे पात्र कायमचे अमर केले. मात्र, बातमीनुसार शाहरुखच्या आधी हा सिनेमा सैफला ऑफर करण्यात आला होता.

यापूर्वी सैफला चित्रपटात राज मल्होत्राच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव सैफने चित्रपट करण्यास नकार दिला. सैफनंतर ही भूमिका शाहरुख खानला देण्यात आली. राजच्या व्यक्तिरेखेत शाहरुखने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचवेळी या चित्रपटाच्या यशाने शाहरुखच्या कारकीर्दीत भर पाडली होती. जर सैफने या चित्रपटाला हो म्हटलं असतं तर त्याच्या कारकीर्दीत एक खूपच प्रतिष्ठित चित्रपट जोडला गेला असता.

कुछ कुछ होता है:

शाहरुख खानचा आणखी एक मोठा हिट चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ हा आहे. ज्यामध्ये सैफलाही खास भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटात सैफ अली खानला प्रेमची भूमिका देण्यात आली होती. मात्र, या चित्रपटात सहाय्यक भूमिका मिळाल्यामुळे सैफने हा चित्रपट करण्यास नकार दिला.

यानंतर सलमानला या भूमिकेची ऑफर देण्यात आली आणि त्याने ती स्वीकारली. चित्रपटात शाहरुखची मुख्य भूमिका असूनही सलमानने प्रेमच्या भूमिकेत बरीच प्रशंसा मिळवली होती. आजही ही भूमिका न केल्याबद्दल सैफला पश्चाताप होत असेल. सैफ अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना त्याचा मागील चित्रपट ‘तान्हाजी’ सर्वांना खूप आवडला होता. आता तो लवकरच ‘आदिपुरुष’ या नवीन चित्रपटात दिसणार आहे.

Aniket Ghate