म्हणून करीनाशी लग्न करण्यापूर्वी सैफने लिहिलं होतं अमृताला पत्र!!!

म्हणून करीनाशी लग्न करण्यापूर्वी सैफने लिहिलं होतं अमृताला पत्र!!!

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. यात अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान ही जोडी कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सैफने २०१२ साली अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं.

मात्र, करीनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफने त्याच्या पहिल्या पत्नीला म्हणजे अमृताला एक भावनिक पत्र लिहिलं होतं. आज अमृता सिंहचा वाढदिवस. त्यामुळे सैफने अमृताला भावनिक पत्र का लिहिलं होतं ते जाणून घेऊयात.

२००४ मध्ये सैफ आणि अमृता कायदेशीरित्या विभक्त झाले. त्यानंतर त्यांना दोन मुलेही झाली सारा आणि इब्राहिम. पण काही काळानंतर त्या दोंघाचे नाते टिकू शकले नाही व ते दोघे वेगळे झाले त्यानंतर 2012 साली सैफने करीनासोबत लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला सारा अली खानदेखील उपस्थित होती.करीना कपूरशी लग्न झाल्यानंतर सैफने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने लग्नापूर्वी अमृताला पत्र लिहिल्याचा खुलासा केला.

“मी अमृताला भावनिक पत्र लिहिलं होतं. अर्थात, आम्ही जो चांगला काळ एकत्र घालवला त्याबद्दल आणि भविष्याबद्दल हे पत्र होतं. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करीनाला दाखवलं होतं. तिनं खूप शांतपणे ते पत्र वाचलं. हे पत्र मी अमृताला पाठवलंच पाहिजे असंही तिनं मला सांगितलं. तिने मला तेव्हा पाठिंबा दिला होता”, असं म्हणत सैफनं आतापर्यंत न सांगितलेला अनुभव करणच्या कार्यक्रमातून व्यक्त केला.

Aniket Ghate