अहमदनगरचा हा कलाकार 300 हुन अधिक चित्रपट करूनही राहिला नजरेआड, शेवटी झाला दुखद अंत…

अहमदनगरचा हा कलाकार 300 हुन अधिक चित्रपट करूनही राहिला नजरेआड, शेवटी झाला दुखद अंत…

जुन्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडायची. तसेच खलनायकाचे पात्रही चित्रपटांमध्ये महत्वाचे असते. त्या खलनायकांपैकी एक दुष्ट बदमाश इन्स्पेक्टर गोडबोले उर्फ सदाशिव अमरापूरकर देखील होता.

सदाशिव अमरापूरकरला ओळखीची गरज नाही. एकेकाळी चित्रपट खलनायकाशिवाय अपूर्ण वाटत होता. त्याच वेळी, त्या काळात काही प्रसिद्ध खलनायक असायचे. त्यापैकी एकाचे नाव सदाशिव अमरापूरकर होते. आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने लाखो लोकांच्या हृदयात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

जेव्हा लोक त्याला चित्रपटाच्या पडद्यावर पाहायचे तेव्हा त्याच्याबद्दल लोकांची वेगळी प्रतिक्रिया असायची. तो खरोखरच मोठा खलनायक आहे असे वाटत असे. तो कोणत्याही पात्राला जीवदान द्यायचा.लोक त्याला पडद्यावर वाईट म्हणायचे आणि कौतुकही करायचे.

सदाशिवला काला नाग म्हणूनही ओळखले जाते. एका चित्रपटात त्याने काला नाग नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती.त्यामध्ये तो स्वत:ला वारंवार काला नाग म्हणत होता. त्यामुळे त्याचे नाव लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याचा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला आहे, पण अभिनय करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यानेे रंगभूमीवर पदार्पण केले.

पण अभिनेता आता आपल्यासोबत नाहीये. सदाशिवचे 2014 मध्ये वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. फुफ्फुसात सूज आल्याने त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

Team Hou De Viral