sachin pilgaonkar show only two scenes from ashi hi banwa banwi fil and v shantarak agreed to do film spg 93 |चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ‘या’ कारणासाठी दिला होता ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला होकार

sachin pilgaonkar show only two scenes from ashi hi banwa banwi fil and v shantarak agreed to do film spg 93 |चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ‘या’ कारणासाठी दिला होता ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला होकार

आपल्याकडे ‘शोले’ चित्रपटाची पारायण केली जातात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ‘शोले’ चित्रपटाबद्दल आपले मत सांगत असतो. ‘शोले’प्रमाणे आणखीन एक चित्रपट प्रामुख्याने मराठी घरांमध्ये बघितलं जातो तो म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हक्काचा विनोदी चित्रपट. असा चित्रपट ज्यातला कुठलाही सीन लावला तरी आपण खळखळून हसतो. मात्र आज जरी आपण हसत असलो तरी हा चित्रपट केवळ दोन सीन्सवरून लिहला गेला आहे.

‘अशी बनवा बनवी’चे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी आपल्या आत्मचरित्रात ( हा माझा मार्ग ऐकला) लिहलं आहे की ‘अशी बनवा बनवी’ करताना त्यांच्या डोक्यात फक्त दोन सीन्स होते ते म्हणजे ‘बालगंधर्व नाट्यगृहातील आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे डोहाळेजेवण, सचिन पिळगावकर यांनी हे दोन सीन्स चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ऐकवले आणि ते ऐकल्यावर त्यांनी टाळी वाजवत मनमुराद हसले आणि या चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. सचिन पिळगावकर यांनी लीहले आहे की व्ही शांताराम शांताराम यांना सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम करायचे होते. या चित्रपटात व्ही . शांताराम यांच्या नातवाने म्हणजे सुशांत रे ने शंतनू हे पात्र साकारले होते.

वाघा बॉर्डरवर ‘हर हर महादेव’ची गर्जना! सैनिकांबरोबर कलाकारांनी साजरी केली दिवाळी

आज या चित्रपटाने तब्बल ४ दशकं लोकांना हसवलं आहे. त्याकाळात या चित्रपटाने कोटींची कमाई केली होती. चार मित्र घर मिळवण्यासाठी नाना प्रकार करतात. आणि पुढे जो एक एक प्रसंग घडत जातो आणि चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत हसवत ठेवतो. एखाद्या उत्तम कलाकृतीसाठी उत्तम भट्टी जमून यावी लागते तशी या चित्रपटात होती. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट हृषीकेश मुखर्जी यांच्या एका चित्रपटाचा रिमेक आहे.

अवघ्या दोन सीन्सवर पूर्ण चित्रपट बांधणे यात नक्कीच लेखक वसंत सबनीस यांचे श्रेय आहे. आणि अखेर सचिन पिळगावकर ज्यांनी हा चित्रपट बनवून तमाम रसिक प्रेक्षकांना तेव्हा हसवले, आजही हसवत आहे आणि पुढची अनेक दशक हसवतील हे नक्की…

Aniket Ghate