हातात तांबे, पितळेचे कडे घालताय? घालण्याआधी हे जरूर वाचा, नाहीतर होईल तुमचेच नुकसान

हातात तांबे, पितळेचे कडे घालताय? घालण्याआधी हे जरूर वाचा, नाहीतर होईल तुमचेच नुकसान

हल्ली बऱ्याच जणांना हातात कडा घालण्याची आवड असते. लोखंड, पितळ, तांबे यांचे कडे केवळ मुली नव्हे तर मुलेही घालत आहेत. हे कडे हातात दिसायला चांगले दिसतात मात्र तुम्हाला माहीत आहे का? हे कडे हातात दिसायला जरी चांगले दिसत असले तरी हे घालण्याचे काही नियम आहेत.

नियम न पाळता कडे घातल्यास नुकसान होऊ शकते. तसेच हे कडे प्रत्येकाला सूट होतीलचं असे नाही. काही लोकांना हे कडे घातल्यास फायदा होतो मात्र काहींना नुकसानही होते. जाणून घ्या कडा घालण्याबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

ग्रहांशी संबंधित कडे घालत असल्यास – ग्रहांशी संबंधित धातुचे कडे जर तुम्ही वापरत असाल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कडे घालणे हे जानवे घालण्यासारखे आहे. यासाठी कडा घातल्यानंतर यज्ञोपवीतचे नियम पाळले पाहिजे. मास-दारू तसेच तामसी भोजन करताना कडे घालण्याऱ्या व्यक्तीवर याचा मोठा प्रभाव होतो.

शत्रु ग्रह बिघडू शकतो खेळ – लोखंडाचा कडा, स्टीलचा कडा शनी ग्रहाचा धातू मानण्यात आला आहे. हा कडा घालताना विशेष काळजी घ्यावी. शनीचे कडे घालणे योग्य आहे मात्र शत्रु ग्रहही शनीसोबत असल्याचा त्याचा विपरित परिणाम पाहायला मिळतो. जसे शनि कुंडलीत कुठेही असेल तर तो पराक्रमी मानला जातो मात्र पराक्रमात आधीपासूनच चंद्र अथवा शनिचा शत्रू ग्रह असेल तर यामुळे नुकसान होईल.

ग्रहांची स्थिती पाहून कडे घाला – ज्याप्रमाणे सोन्याचे कडे सूर्य, तांब्याचे कडे मंगळ, चांदीचे कडे चंद्र आणि पितळेचे कडे गुरूसाठी असतात त्याचप्रमाणे असे कडे घालण्यापूर्वी ग्रहांच्या स्थितीची माहिती असणे गरजेचे आहे. धातूचेकडे घालण्याआधी ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्या.

मिश्र कडा घातल्याने होणार नाही नुकसान – पितळ, तांबे आणि चांदीमिश्रित कडा घातल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. यात सर्व धातू असून त्यांचे प्रमाण समान आहे त्यामुळे ग्रहांच्या स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही. पितळेने गुरू, तांब्याने मंगळ आणि चांदीमुळे चंद्र बलवान होतात.

नकारात्मक शक्तींपासून होतो बचाव – जर तुमच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव असेल तर तुम्हाला पितळ अथवा तांबे मिश्रित कडा घातला पाहिजे. हा कडा हनुमानाचे प्रतीक मानले जाते. या कड्याच्या प्रभावाने भूत-प्रेत तसेच नकारात्मक उर्जा दूर होते.

आजारांपासून मिळते संरक्षण – जर तुमच्या घरातील सदस्य नेहमी आजारी असेल तर त्या व्यक्तीला अष्टधातूचे कडे घालणे शुभ असते. उजव्या हातात मंगळवारी हे कडे बनवून घ्यावे आणि शनिवारी या कड्याला खरेदी कर हनुमान मंदिरात बजरंगबलीच्या चरणावर हे कडे ठेवावे. हनुमान चालिसाचे पठण करावे. यानंतर हनुमानाला थोडा शेंदूर लावून हा कडा आजारी व्यक्तीला घालावा. हा कडा हनुमानाचा आशीर्वाद असतो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate