तुम्हाला माहित आहे का, खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? जाणून घ्या…

तुम्हाला माहित आहे का, खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? जाणून घ्या…

सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शिवपूजनात प्रामुख्याने वाहिल्या जाणाऱ्या बेल अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महतीही थोर आहे.

रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे, तेवढेच अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. श्रावण, महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, रुद्राक्ष खरा आहे की नाही, याची खात्री करून मगच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो.

याशिवाय, रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय रुद्राक्ष धारण करू नये. खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? हे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. तर या महिन्यात माता पार्वती देवीने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, त्याचे फळ तिला श्रावण महिन्यात मिळाले होते.

त्यामुळे शिवाला प्रसन्न करून घ्यायचे असल्यास श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावणात शिवपूजनात बेलाचे पान विशेष करून वाहिले जाते. महादेव शिवशंकराला केवळ एक बेलाचे पान वाहिले तरी, संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
तर सर्वप्रथम रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात.

हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. तसेच या झाडाची फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते.

याशिवाय, रुद्राक्षाचा रंग सर्वसाधारणपणे तांबूस रंगाचा असतो. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. कारण कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात.

तर यामध्ये तुम्हाला खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे, याची खात्री बाळगायला हरकत नाही.

जे पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हे पाच-दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो, असे सांगितले जाते. याशिवाय, तांब्याच्या 2 भांड्यामध्ये व तांब्याच्या 2 पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो.

खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही, तसा उकळत्या पाण्यात जर 6-8 तास ठेवल, तरी त्याचे विघटन होत नाही. रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत किंवा वाकत नाही. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते. खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही, असे सांगितले जाते.

तसेच अस्सल रुद्राक्ष जड आणि सतेज असतो. त्याची मुखे स्पष्ट असतात. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक, अशी शुभचिन्हे असलेला रुद्राक्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष सर्वांत चांगला आणि अत्यंत शुभ मानला जातो. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात.

पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात. रुद्राक्षाच्या झाडाला वर्षाला एक ते दोन सहस्र फळे लागतात. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही, असे सांगितले जाते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Team Hou De Viral