‘बच्चन’ घराण्याचा बाजार उघडयावर, सासरा-सुनेच्या नात्याबाबतचे धक्कादायक रहस्य आले लोकांसमोर…

‘बच्चन’ घराण्याचा बाजार उघडयावर, सासरा-सुनेच्या नात्याबाबतचे धक्कादायक रहस्य आले लोकांसमोर…

चित्रपटसृष्टीत मोठे स्थान प्राप्त केल्यानंतर, जागतिक सौंदर्य आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ‘बच्चन’ कुटुंबाची सून बनली. तिने 2007 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून ऐश्वर्या आनंदी आयुष्य जगत आहे.

बच्चन कुटुंबातील तीचे बाँडिंग खूप सुंदर आहे आणि यामुळेच ऐश्वर्या लग्नानंतर आणि मुलीच्या जन्मानंतरही फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. पण ऐश्वर्याच्या सासूबाई म्हणजेच जया बच्चन यांनी एकदा अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल असा काही खुलासा केला होता की, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.

हे प्रकरण 2007 सालचे आहे जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक लग्न करणार होते. याआधी जया बच्चन करण जोहरच्या सर्वात लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सहभागी झाल्या होत्या. ऐश्वर्याला पाहून अमिताभ बच्चन फुलतात, असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.

खरंतर अमिताभ बच्चन सून ऐश्वर्याला आपली मुलगी मानतात. जया बच्चन यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, “मुलगी श्वेता निघून जाताच सून ऐश्वर्याने मुलीची जागा घेतली आणि श्वेताची कमतरता भरून काढली.”

याशिवाय जया बच्चन म्हणाल्या होत्या की, “सून ऐश्वर्याला पाहून सासरे अमिताभ बच्चन खूश झाले. आपली मुलगी श्वेता घरात असल्याचा त्यांना भास होतो. श्वेतामुळे घरात निर्माण झालेली पोकळी ऐश्वर्याने भरून काढली. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते तिला पाहून थक्क झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ऐश्वर्याला बघून त्याांना आपली मुलगी श्वेता समोर उभी आहे असे वाटू लागले.

विशेष म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांची सून ऐश्वर्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्यालाही तिच्या सासू-सासऱ्यांचा खूप आदर आहे आणि ती नेहमीच तिच्या कुटुंबासोबत दिसते. ऐश्वर्या रायचे सासू जया बच्चनसोबतचे बाँडिंगही चांगले आहे आणि दोन्ही आई मुलींप्रमाणे राहतात.

अमिताभ बच्चन लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ‘द इंटर्न’, ‘गुडबॉय’ आणि ‘मेडे’ सारखे चित्रपट आहेत. दुसरीकडे, जया बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे.

हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ऐश्वर्या लवकरच निर्माते मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे.

Monish Udbatte