बॉलिवूड हादरलं ! या दिग्गज अभिनेत्याच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूड हादरलं ! या दिग्गज अभिनेत्याच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्री यांचे निधन झाल्याचे आपण पाहिले आहे. दीड ते दोन महिन्यापूर्वी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी आपल्या अवीट सुरांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर अभिनेते रमेश देव यांचे दुःखद निधन झाल्याचे पाहिले.

रमेश देव यांनी देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले होते. या घटनेनंतर बॉलिवुडला बप्पी लहरी यांच्या रुपाने पुन्हा नंतर दुसरा धक्का बसला. बप्पी लहरी यांचे देखील दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. बप्पीदा यांनी स्टेरिंओ साऊंड म्युझिक काय असते, हे पहिल्यांदा दाखवून दिले.

साधरणत: दीड-दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीचा उद्रेक देशासह राज्यांमध्ये होत असताना त्याच वेळेस संगीतकार जोडीतील नदीम-श्रवण यांच्यातील श्रावण राठोड यांचा देखील कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. आपल्या कुटुंबासोबत ते कुंभमेळा येथे गेले होते. मात्र, मुंबईत परत आल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला.

त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आता देखील एका अभिनेत्याच्या मोठ्या भावाचे निधन झाले आहे. अनेक लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना आवडतात. अशा मध्ये आपले आवडते कलाकार काय करताय, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या नवीन गोष्टी घडत आहे, याच्या बद्दल ची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेले बघायला मिळतात.

बॉलीवुड मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. कारण एका लोकप्रिय अभिनेत्याचा मोठ्या भावाचे दुःखद निधन झाले. बॉलीवूड अभिनेते रवी किशन यांचे मोठे बंधू रमेश किशन शुक्ला यांचे बुधवारी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झाले, तर रवी किशन यांचे मोठे भाऊ रमेश किशन हे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांनी त्रस्त होते.

त्यांच्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात गावप्रमुख विराग सिंह यांनी सांगितले. खासदार रवि किशन शुक्ला यांच्याही फोनवर बोलणे झाले. रमेश यांचे पार्थिव गावात आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तीन भावांपैकी ते दुसरे होते. काही काळापासून ते किडनी आणि कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त होते.

त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचता आले नाही. रवी किशन यांना बॉलिवूडसह मालिका विश्वातून अनेकांनी धीर दिला आहे.

Aniket Ghate