प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने ‘ही’ मराठी मालिका होणार बंद

प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने ‘ही’ मराठी मालिका होणार बंद

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर रात्रीस खेळ चाले ही मालिका आली होती. रात्री दहा नंतर ही मालिका प्रसारित व्हायची. या मालिकेतील कथानक अतिशय थरारक असे होते. ही मालिका अनेकांना आवडत होती. रात्रीस खेळ चाले लागल्यावर अनेकजण उत्सुकतेने ही मालिका पाहत असे.

या मालिकेचे पहिले अनेक भाग हे प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर ही मालिका थांबवण्यात आली होती. त्यानंतर आता या मालिकेचे दुसरे भाग देखील प्रसारित करण्यात येत आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार हे सर्वांनाच आवडतात. या मालिकेत अभिराम, कावेरी, सुषमा, छाया, माधव आणि सगळ्यांचा आवडता पांडू हा दिसलेला आहे.

मात्र, या कलाकारांचे खरे नाव काय आहे. त्यांचे वय किती आहे. तसेच त्यांना मालिकेत काम करण्यासाठी किती पैसे मिळतात, अशी माहिती आजवर आपण वाचलेली आहे. या कलाकारांबद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. रात्रीस खेळ चाले या मालिकेचा पहिला भाग हा अतिशय यशस्वी ठरला होता.

त्यानंतर ही मालिका लोकप्रिय ठरल्याने या मालिकेचा दुसरा भाग देखील आला होता. दुसरा भागही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यामुळे तिसऱ्या भागाची चित्रीकरणही सुरू करण्यात आले आणि तिसरा भागही सुरू करण्यात आला. त्यानंतर ही मालिका लोकप्रिय ठरत असतानाच आता ही मालिका संपणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा वाडा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. वाड्यांमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना-घडामोडी प्रेक्षकांना फारच आवडायच्या. त्याचप्रमाणे या मालिकेचे दिग्दर्शन, चित्रीकरण जबरदस्त विचार करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे चित्रीकरणही फार जबरदस्त रित्या करण्यात आले.

त्यामुळे अनेकांना ही मालिका पाहताना भीती वाटायची आणि रात्रीच्या वेळी ही मालिका सुरू असल्याने अनेकांना त्यातले बारकावे देखील पाहता यायचे. मात्र आता रात्रीस खेळ चाले ही मालिका आज शेवटचा भाग होऊन निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. कारण की या मालिकेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

टीआरपी अजिबात या शो ला मिळत नाही आहे, जर टीआरपी मालिकेला मिळाला नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक यांचे फार मोठे नुकसान होते. यामुळे मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मानधन देणे देखील अवघड होते. त्यामुळे आता ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येते.

या मालिकेच्या जागी कुठली मालिका सुरू होणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, आता हा अण्णा नाईक हे , प्रेक्षकांना दिसणार नाहीत हे मात्र नक्की आहे.

Aniket Ghate