भोजपुरी सिनेमा ते हिंदी टीव्ही पर्यंतचा प्रवास आणि आता सर्वात महागडी अभिनेत्री!!!

भोजपुरी सिनेमा ते हिंदी टीव्ही पर्यंतचा प्रवास आणि आता सर्वात महागडी अभिनेत्री!!!

सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री कोण माहीत आहे का? आसामी आणि भोजपुरी सिनेमातून काम करत हिंदी टीव्हीच्या पडद्यावरून घराघरात पोहोचली. छोट्या पडद्याची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मी देसाई.

हिचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 मध्ये आसाममध्ये झाला. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे.

रश्मी देसाई नेहमीच आपल्या बोल्ड आणि हटके अंदाज साठी ओळखली जाते. Bigg Boss 13 मध्येही रश्मीने सहभाग घेतला होता. यातही तिने आपल्या बिनधास्त अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकली होती. 2006 मध्ये रश्मीने झी टीव्हीवरील रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याआधी तिनं भोजपुरी, तमिळ आणि मराठी पडद्यावरही अभिनय केला आहे .

2002 मध्ये आलेल्या एका आसामी चित्रपटात काम केलं. मात्र या चित्रपटात रश्मीला तितकंस यश मिळालं नाही. त्यामुळे तिला हवी ती ओळख कमावता आली नाही. त्यानंतर रश्मीने आपला मोर्चा भोजपुरी चित्रपटाकडे वळवला आणि बघता बघता भोजपुरी चित्रपटाने रश्मीला एक नवी ओळख दिली.

मात्र खरी ओळख मिळवून दिली ती कलर्स वाहिनीवरील ‘उतरन’ या मालिकेने. या मालिकेतली रश्मीने साकारलेली ‘तपस्या’ घराघरात पोहोचली. त्यानंतर रश्मीला छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये गणलं जातं .

रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.

उतरनमधील सहअभिनेता नंदिश संधू याच्याशी तिनं विवाह केला होता, मात्र हे नातं फारकाळ टिकू शकलं नाही. त्यानंतर ती अरहान खान सोबत नात्यात होती परंतु हे नातंही काही काळातच तिनं संपवलं .

‘रश्मीने दिल से दिल तक’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘नच बलिये सिझन 7’ , ‘खतरो के खिलाडी सिझन 6’, ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकांमधून काम केलं आहे.

Aniket Ghate