बॉलिवूड दुःखात ! प्रसिद्ध कॉमेडी बादशहाचे निधन, 41 दिवसांपासून दवाखान्यात देत होता झुंज..

बॉलिवूड दुःखात ! प्रसिद्ध कॉमेडी बादशहाचे निधन, 41 दिवसांपासून दवाखान्यात देत होता झुंज..

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली झुंज अखेरीस संपवून या विनोदी अभिनेत्याचे निधन झाले आहे. होय आम्ही जे सांगतो आहे ते खरे आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांची वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मृत्यूची झुंज सुरू होती.

व्यायाम शाळेमध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूमध्ये प्रचंड गुंतागुंत झाल्याचे देखील सांगण्यात येत होते. अनेकदा त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काही दिवसापूर्वी काढण्यात देखील आले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्राणजोत मालवली.

याबाबत त्यांच्या मुलीनेच माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात मोठ्या भागात शंभर टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. मात्र, त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये शो पसरली असून अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जबरदस्त अशा विनोदाने सर्वांचे मन जिंकले आहेत. त्यांनी अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्यांनी केलेले कॉमेडी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि राजकारणात देखील सक्रिय असतात. मात्र समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणे सुरू केले. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असे आहे.

त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये झालेला आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूर मध्ये ते लहानाचे मोठे झाले. ते एक विनोद वीर म्हणून ओळखले जातात. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी स्टँड अप कॉमेडी करून नाव कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट प्रदर्शन वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी सूत्रसंचालन तसेच आपले विनोद सगळ्यांना ऐकवले आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे. बाजीगर बॉम्बे टू गोवा, आमदनी अठन्नी खर्चा रुपया यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी एक वेगळीच आपली भूमिका वठवली होती. राजू श्रीवास्तव एक जबरदस्त असे विनोद वीर म्हणून देखील समोर आले आहेत. बिग बॉसच्या तिसऱ्या सेशनमध्ये देखील ते सहभागी झाले होते.

त्यानंतर त्यांनी कॉमेडी का महा मुकाबला या शोमध्ये देखील सहभाग नोंदवला होता. नच बलिये या शोमध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे कॉमेडी नाईट विथ कपिल या शोमध्ये देखील त्यांनी काही काळ काम केले. मजाक मजाक मे या शोचे सूत्रसंचालन देखील त्यांनी जबरदस्त रित्या केले होते. त्यांनी अलीकडेच समाजवादी पार्टीमध्ये देखील प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली.

मात्र यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता. राजू श्रीवास्तव यांच्यासाठी अनेकांनी यज्ञ पूजा देखील केल्या होत्या. मात्र, आता राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Team Hou De Viral