रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे मागे ‘एक्स’ असे चिन्ह का असते?

सर्वच भारतीय लोकांसाठी भारतीय रेल्वे हे फार उपयोगाचे साधन आहे. आणि रेल्वे प्रवासादरम्यान आपण अनेक गोष्टी नोंद करतो.
रेल्वे मधून प्रवास करताना एखाद्या स्टेशनवर क्रॉसिंग साठी थांबलेल्या अथवा विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर इंग्रजीतील ‘x’ सारखे दिसणारे ‘क्रॉस’ हे चिन्ह पहिले असेल. ही ‘क्रॉस’ ची खुण दर्शवते की हा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. ह्या ‘क्रॉस खुणेसोबतच प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर इंग्रजी मधील “LV” ही अक्षरे नोंदवलेली असतात. आणि रात्रीच्या वेळी ह्याच जागेवर चालू बंद होणारा एक लाल दिवा लावलेला असतो.
रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वेच्या ह्या गोष्टी शेवटच्या डब्यांवर असणे बंधनकारक असते. इंग्रजीतील “LV” ह्या अक्षरांचा अर्थ होतो “लास्ट वेहिकल” अर्थात शेवटचे वाहन. थोडक्यात ह्या सर्व खुणा रेल्वेचा शेवट दर्शवण्याकरिता आकारलेल्या असतात. रेल्वेच्या इतर कुठल्याही डब्यांवर ह्या खुणा नोंदवल्या जात नाहीत. रेल्वे इथे संपली हे दर्शवणे हाच एकमेव उद्देश्य इथे असतो.
रेल्वे इथे संपते हे खुणेने सांगणे रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. रेल्वे सुरवातीच्या स्थानकापासून प्रवासाला निघाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक स्थानकांवरील नियंत्रक (स्टेशन मास्टर) तसेच प्रत्येक सिग्नल कॅबीन मधील नियंत्रक ह्या खुणेवर लक्ष ठेऊन असतात. जेव्हा एखादी रेल्वे त्या स्थानकावरून जाते, तेव्हा ह्या खुनेवरून स्थानक नियंत्रकांना संपूर्ण रेल्वे स्थानकातून गेली असल्याची खुण मिळते.
जर त्या रेल्वेच्या शेवटच्या डब्या मागे वर उल्लेखलेल्या खुणा नसतील, ह्याचा अर्थ रेल्वेचे सर्व डबे स्थानकात दाखल झाले नाहीत असा घेतला जातो. तांत्रिक कारणामुळे, आपल्या प्रवासात रेल्वेचे काही डबे इतर डब्यांपासून वेगळे होऊ शकतात, अन ह्याची सूचना रेल्वेच्या चालकाला येईलच असे नाही.
अशावेळी, जर काही डबे रेल्वे पासून वेगळे झाले असतील तर ती चूक स्थानक नियंत्रकाच्या लक्षात येते आणि तो तत्काळ आवश्यक ती पाऊले उचलू शकतो. रेल्वेचे काही डबे जर वेगळे झाले असतील, तर ते स्थानकांच्या दरम्यान येणाऱ्या ‘ब्लॉक सेक्शन’ मध्ये अडकले असण्याची शक्यता असते. अन अशावेळी पाठीमागून येणाऱ्या रेल्वे मुळे ह्या डब्यांना अपघात होऊ शकतो.
त्यामुळे स्थानक नियंत्रक आणि सिग्नल केबिन नियंत्रक ही खुण पाहून नक्की करतात के की संपूर्ण रेल्वे आहे तशी स्थानकावरून गेली आहे. दिवसाच्या वेळी ही ‘क्रॉस’ खुण आणि रात्रीच्या वेळी चमकता लाल दिवा हे निश्चित करतात की रेल्वेचे सर्व डबे सुरक्षित आहेत.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.