radhika apte reacts on why she is not doing marathi films | मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवलीस का? राधिका आपटे म्हणते, “मागच्या ३ वर्षांत मला…”

radhika apte reacts on why she is not doing marathi films | मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवलीस का? राधिका आपटे म्हणते, “मागच्या ३ वर्षांत मला…”

अभिनेत्री राधिका आपटे ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी आहे ज्यांनी कोणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्कं केलं. स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर तिने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राधिका आपटे लवकरच ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने मराठी चित्रपटांत न दिसण्यावर भाष्य केलं.

राधिका आपटेने कधीकाळी तिच्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटांपासून केली होती. २००९ मध्ये ‘घो मला असला हवा’ मधून तिने करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय तिने ‘तुकाराम’, ‘पोस्टकार्ड’, ‘लय भारी’, ‘समांतर’ अशा काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अलिकडच्या काळात ती एकाही मराठी चित्रपटात दिसलेली नाही. यावर तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
आणखी वाचा- “गावातली मुलगी ते सेक्स कॉमेडी…” राधिका आपटेने मांडलं स्वतःच्या बोल्ड भूमिकांबद्दलचं मत

राधिका आपटेला या मुलाखतीत “मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राधिका म्हणाली, “मला असं अनेकदा विचारलं जातं. पण खरं सांगायचं तर मला ३ वर्षांत एकाही मराठी चित्रपटासाठी विचारणा झालेली नाही. त्याआधी काही प्रोजेक्टसाठी विचारण्यात आलं होतं. पण त्यांच्या स्क्रिप्ट मला आवडल्या नव्हत्या त्यामुळे मी नकार दिला होता. मात्र स्क्रिप्ट आवडली पण तो केवळ मराठी चित्रपट आहे म्हणून मी नकार दिला असं कधीच झालेलं नाही. कोणतीही भूमिका निवडताना माझ्यासाठी भाषेचा मुद्दा कधीच महत्त्वाचा नसतो.”

आणखी वाचा-“तुषार कपूरशी माझं नाव जोडलं गेलं, तेव्हा…”; राधिका आपटेने केला खुलासा

दरम्यान अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने, आगामी काळात ती काही निवडक प्रोजेक्ट करणार असून तिचा कल अभिनयाव्यतिरिक्त नवीन काहीतरी करण्याकडे आहे असं म्हटलं होतं. सध्या राधिका आपटे स्क्रिप्ट रायटिंग शिकत आहे. करोनाच्या काळात केवळ अभिनयच नाही तर त्याहून जास्त काही करता येईल अशी जाणीव आपल्याला झाल्याचं राधिकाने या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

Aniket Ghate