मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने घेतली महागडी गाडी, पण सामाजिक भान विसरला नाही

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने घेतली महागडी गाडी, पण सामाजिक भान विसरला नाही

गाडी घेणं, घर घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यातही जगभरात इलेक्ट्रिक गाडी वापरण्याकडे आणि खरेदी करण्याकडे जास्त ओढा दिसून येतो. फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटीही आता इलेक्ट्रिक कार घेण्याचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री.

पुष्करनेही नुकतीच एक ईव्ही गाडी अर्थात इलेक्ट्रिक गाडी घेतली. MG ZS EV गाडी घ्यायला त्याने प्राधान्य दिलं आहे. विशेष म्हणजे इलेक्टिक गाडी घेण्यामागेही हरहुन्नरी अभिनेत्याचं एक खास कारण आहे. मटा ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर म्हणाला की, ‘मला एक गाडी घ्यायचीच होती. पण यावेळी मी जाणीवपूर्वक इलेक्ट्रिक गाडी घ्यायचं ठरवलं होतं. याची दोन मुख्य कारणं होती.

एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमती आणि दुसरं म्हणजे जगात वाढणारं कार्बन फुटप्रिन्ट. एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्यापरिने जे शक्य आहे ते केलं पाहिजे. याचमुळे मी MG ZS EV गाडी घेण्याचा निर्णय घेतला. मुळात ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि आरामदायी आहे शिवाय गाडीत सगळ्या अद्यावत सुविधाही आहेत.’

एमजी मोटर इंडियाची झेड एस ईव्ही ही गाडी तिच्या सेगमेंटमधली सर्वात मोठी ५०. ३ केडब्ल्यूएच बॅटरी आणि अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. ही गाडी सिंगल चार्जिंगमध्ये जवळपास ४६१ किमीपर्यंत धावते. या गाडीमध्ये जागतिक स्तरावर प्रमाणित बॅटरी आहे. यात आग, अपघात, धूळ, धूर अशा एकूण आठ सेफ्टी टेस्ट पार केल्या आहेत.

छायाचित्र सौजन्य – MaharashtraTimes.Com

बाजारात या गाडीची किंमज जवळपास २२ लाख ते २६ लाख रुपये इतकी आहे.

Aniket Ghate