जर तुम्हीही करत असतात नियमित या चुका तर सावधान, माता लक्ष्मी होऊ शकते नाराज

जर तुम्हीही करत असतात नियमित या चुका तर सावधान, माता लक्ष्मी होऊ शकते नाराज

लक्ष्मी मातेला धन आणि सौभाग्याची देवी मानले जाते. मान्यतेनुसार ज्या घरात ती जाते तेथील लोकांवर तिची कृपादृष्टी राहते. लोक आराम आणि सुख मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला आनंदित करतात.

अनेकजण तर लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी तिची विशिष्ट पद्धतीने पुजाही करतात. मात्र काही जणांवर ही कृपा राहत नाही आणि लक्ष्मी माता ते घर नेहमीसाठी त्यागते. जाणून घ्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे त्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहत नाही.

ज्या घरात नियमितपणे साफसफाई होत नाही अथवा जी स्त्री स्वत:ला स्वच्छ साफ ठेवत नाही अशा घरात लक्ष्मीचा वास नसतो. जर एखादी स्त्री दिवसा झोपत असेल तसेच आपल्या सासू-सासऱ्यांचा अनादर करत असेल तर त्या घरात लक्ष्मी टिकत नाही.

ज्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळा देवाची पुजा केली जात नाही अशा घरात लक्ष्मी राहत नाही. ज्या घरातील प्रमुख व्यक्ती वा इतर लोक सूर्योदयानंतरही झोपून राहतात. अशा घरात लक्ष्मी दीर्घकाळासाठी वास करत नाही.

यासोबतच आळशी लोक, देवावर विश्वास नसलेले, भ्रष्टाचारी, चोर तसेच कपटी लोकांच्या घरी लक्ष्मी राहत नाही. अशा लोकांवर लक्ष्मीची कृपा राहत नाही. ज्या घरात पत्नी आपल्या पतीचा सन्मान करत नाही त्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाते.

ज्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होत असतो. अथवा पती अवाथ सासू-सासरे वारंवार आपल्या सुनेला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलत असतात अथवा तिचा अपमान करत असतात.

तिच्याशी नोकराप्रमाणे वागतात अशा घरात लक्ष्मी टिकत नाही. ज्या घरात लक्ष्मी स्तोत्राचे पठण केले जात नाही आणि धनाचा अपव्यय होतो अशा घरातील लोकांना लक्ष्मी मातेचे सुख मिळत नाही.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची आराधना केल्यास आपल्या आयुष्यात धनसंपत्तीची कमी राहत नाही. दरम्यान, लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न व्हावी यासाठी शुक्रवारच्या दिवशी गुळाचा उपाय जरूर करून बघा.

प्राचीन काळात हा उपाय सांगण्यात आला आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. शुक्रवारी तुपाचे दान केल्यास अथवा गूळ दान केल्यास तुमच्या लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate